आश्चर्यच...चक्क पोलीसाची बाईकच झाली गायब..पोलीस उपायुक्त कार्यालय आवारातील प्रकार!

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 मे 2020

लॉकडाऊनच्या या काळात शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट नाकाबंदी करीत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले गेले. शहरभर पोलिसांचा कडेकोट पहारा होता. त्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये किरकोळ स्वरुपाचे गुन्हे वगळता मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये घट आली होती. पण लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीसांसमोर आता डोकेदुखी वाढली आहे. अशातच आता चोरांनी मोठी हिम्मत करत गुन्हा केला आहे.

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू लागल्यामुळे गेल्या 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या या काळात शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट नाकाबंदी करीत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले गेले. शहरभर पोलिसांचा कडेकोट पहारा होता. त्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये किरकोळ स्वरुपाचे गुन्हे वगळता मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये घट आली होती. पण लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीसांसमोर आता डोकेदुखी वाढली आहे. अशातच आता चोरांनी मोठी हिम्मत करत गुन्हा केला आहे.

असा घडला प्रकार
पोलीस शिपाई इम्रान सलीम शेख (मुंबईनाका. पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.15) रात्री नऊच्या सुमारास ते शरणपुररोड येथील एचडीएफसी हाऊस समोरील सिग्नल या पॉंईटवर नियुक्तीला आले होते. त्यांनी त्यांची 50 हजार रुपयांची शाईन दुचाकी (एमएच 15 जीजे 7263) समोरच असलेल्या पोलिस उपायुक्त परिमंडळ एकच्या आवारात पार्क केली होती. कर्तव्य करून ते सकाळी आठ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांची दुचाकी पार्क केलेल्या जागेवर नव्हती. अज्ञात चोरट्याने ती लंपास केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुन्या पोलिस आयुक्तालयाच्या आवारातून चक्क पोलिसाचीच दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

लॉकडाऊन शिथिलतेचा परिणाम 

काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. यातही टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या बहुतांशी व्यापारी-व्यावसायिकांची दुकाने सुरू झाली आहेत. रस्त्यावर रहदारी वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या सुरू झाल्या आहेत. बाजारपेठांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. परिणामी शहरात वर्दळ वाढू लागली असून नाकाबंदीच्या ठिकाणीही पोलिसांची उपस्थिती आता राहत नाही. मात्र त्याचा परिणाम आता कुठेतरी दिसू लागला आहे.

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police bike was stolen Incidents in Deputy Commissioner of Police office area Nashik marathi news