संतापजनक! विधवा पोलीस पत्नीचा चक्क हवालदाराकडूनच विनयभंग..लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 11 June 2020

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रिद पोलीस दलाचे आहे. सध्या कोरोनाच्या कालावधीत पोलिसदलाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अतिशय सहानुभूतीपुर्वक आणि सकारात्मक झाला आहे. त्यातच अशी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

नाशिक : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रिद पोलीस दलाचे आहे. सध्या कोरोनाच्या कालावधीत पोलिसदलाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अतिशय सहानुभूतीपुर्वक आणि सकारात्मक झाला आहे. लॉकडाऊन काळातच काही पोलिसांकडून पोलीस दलाची प्रतीमा मलीन करणारे कृत्यदेखील घडले आहे. त्यातच अशी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

‘खाकी’ला अशोभनीय वर्तन...असे कृत्य

खंडू सुखदेव बेंडकुळे (रा. जय योगेश्‍वर बंगला, गणेशनगर, जेलरोड) असे संशयित पोलिस हवालदाराचे नाव आहे. पीडित विधवा पोलिस पत्नीच्या फिर्यादीनुसार, संशयित हवालदार बेंडकुळे याने म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेकडून 70 हजार रूपये हात ऊसनवार घेतले होते. विधवा महिलेचे पतीही ग्रामीण पोलीस दलात होते. तर संशयित बेंडकुळे हेही ग्रामीण पोलिसात कार्यरत असून पीडितेच्या पतीचे तो मित्र आहे. त्यामुळे संशयिताने नेहमी येणे-जाणे होते. आर्थिक अडचणीमुळे संशयिताने पीडितेकडून 70 हजार रूपये हातऊसनवार घेतले होते. मात्र पैशांची परतफेड न केल्याने पीडितेने गेल्या शनिवारी (ता. 6) जेलरोड गाठले होते. संशयिताने सैलानी बाबा स्टॉपवर महिलेस गाठून शिवीगाळ केली आणि भररस्त्यात त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मनिषा राऊत करीत आहेत. 

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police's wife was molested by a constable nashik marathi news