VIDEO : "हे तर राजकीय षडयंत्र! केवळ मला बदनाम करण्याच्या दृष्टीनेच असे आरोप" - छगन भुजबळ

This is a political conspiracy over maratha reservation says chhagan bhujabal nashik marathi news
This is a political conspiracy over maratha reservation says chhagan bhujabal nashik marathi news

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे, अशी सर्वच पक्षांची भुमिका आहे. मात्र केवळ मला बदनाम करण्याच्या दृष्टीनेच असे आरोप केले जात आहे यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. माझे कार्यक्रम दहा दिवसांपूर्वीच नियोजित होते. याबाबत आंदोलनकर्त्यांनाही वेळ कळविण्यात आली होती. त्यावेळेत ते जर आले असते तर मी नक्कीच त्यांना भेटलो असतो. मराठा आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी, शुक्रवारी नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मला घेराव घातला. त्यावेळी भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

मराठा आरक्षण हा हेतू नाही

काही लोक माझ्याविरोधात सतत्याने राजकरण खेळतात, तसेच समाजात माझ्याविरोधात मुद्दामहून विष पेरण्याच काम करत असतात. त्याच्यापाठीमागे मराठा आरक्षण हा हेतू नाहीये तर त्यांचे दुसरे राजकिय हेतू आहेत त्यामुळे ते  असे वेगवेगळे आरोप करतात असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे व्यक्त केले.या पुढे भुजबळ म्हणाले की, त्यांना मराठा आरक्षण हा मुद्दा असता तर ते थोडं उशिरा आले असते आणि थांबले असते. मी साडे दहा वाजता गेलो ते साडे आकरा वाजता आले, मी दिड वाजता येथे पोहचलो तर ते एक वाजता निघून गेले होते. याच्यानंतरही ते आले तर मी त्यांना भेटायला तयार आहे. 

भुजबळ फार्म बाहेर आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही मात्र दलीत, आदीवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी सर्वच पक्षांची भूमिका असल्याचे मत ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले होते. पोलीस भरती रद्द करावी, मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका छगन भुजबळ यांनी स्पष्ट करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज तर्फे भुजबळ फार्म बाहेर आंदोलन करण्यात आले होते पण पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट न झाल्याने आंदोलकांनी निवेदन भुजबळ फार्मच्या गेटला चिकटवले त्यासंदर्भात भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

अगोदर वेळ घेऊन यायला पाहिजे

पत्रकारांनी फोनवरुन आंदोलनकर्त्यांची नाराजी दूर करण्यासंदर्भात विचारले असता भुजबळ यांनी तसे करणाप नाही असे उत्तर दिले. ते म्हणाले की त्यांनी भेटायला येण्याआधी संपर्क साधण्याची गरज होती. कार्यालयातर्फे त्यांना आधिच कळवण्यात आलं होतं. त्यामुळे ते पुन्हा कधीही भेटण्यासाठी येऊ शकतात. पण त्यानी अगोदर वेळ घेऊन यायला पाहिजे, माझ्या ऑफिसमधील मिटींग मागेपुढे करता येतील, पण सार्वजनिक कार्यक्रम  जेथे आदिवासी, शेतकरी आमदार, जिल्हाधिकारी येणार आहेत जे पंधरा दिवस आगोदर ठरलेले कार्यक्रम असतील तर ते पुढे ढकलता येत नाहीत असं भुजबळ म्हणाले. 

संपादन - रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com