साहित्य संमेलनाध्यक्षपदाची आज अधिकृत घोषणा; एकमत न झाल्‍यास मतदानातून निवड

अरुण मलाणी
Sunday, 24 January 2021

यासंदर्भात रविवारी (ता. २४) पुन्हा सर्व सदस्‍यांच्‍या उपस्‍थितीत बैठक घेत शिक्‍कामोर्तब केला जाणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. आजच्‍या बैठकीत संमेलनातील चर्चासत्रांच्‍या विषयांवरही चर्चा झाली. यासंदर्भातही अंतिम निर्णय सर्वांचे मत विचारात घेतल्‍यानंतर जाहीर केले जाणार आहे. 

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे स्‍वरूप ठरविण्यासाठी अखिल भारतीय साहित्‍य महामंडळाच्‍या दोनदिवसीय बैठकीला शनिवारी (ता. २३) येथे सुरवात झाली. संमेलनाध्यक्षपदासाठी एकमत न झाल्‍यास मतदानातून निवड केली जाणार असल्‍याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. दरम्‍यान, संमेलनासाठी २६ ते २८ मार्च ही तारीख निश्‍चित झाली असून, यासंदर्भातही अधिकृत घोषणा तसेच, संमेलनाध्यक्षांच्‍या नावाची घोषणा रविवार (ता.२४) च्‍या बैठकीनंतर केली जाणार आहे. 

अंतिम निर्णय सर्वांचे मत विचारात घेतल्‍यानंतर

संमेलनाच्‍या तारखांसंदर्भात चर्चेदरम्‍यान मार्चच्‍या मध्यावधीत संमेलन घेण्याबाबत विचार मांडण्यात आला. परंतु, आयोजकांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी एप्रिलमधील तारखांसंदर्भात चर्चा सुरू असताना, मार्चअखेरपर्यंत संमेलन घेणे आवश्‍यक असल्‍याचे सांगण्यात आले. त्‍यामुळे यापूर्वी चर्चेत असलेल्‍या २६ ते २८ मार्चच्‍या तारखांबाबत सकारात्‍मकता दर्शविली असून, यासंदर्भात रविवारी (ता. २४) पुन्हा सर्व सदस्‍यांच्‍या उपस्‍थितीत बैठक घेत शिक्‍कामोर्तब केला जाणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. आजच्‍या बैठकीत संमेलनातील चर्चासत्रांच्‍या विषयांवरही चर्चा झाली. यासंदर्भातही अंतिम निर्णय सर्वांचे मत विचारात घेतल्‍यानंतर जाहीर केले जाणार आहे. 

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

संमेलनाध्यक्षपदाचा आज निर्णय 

दोनदिवसीय बैठकीदरम्यान रविवारी संमेलनाध्यक्षांच्‍या नावाची घोषणा होणार आहे. या बैठकीप्रसंगी संलग्‍न संस्‍थांचे एकूण १९ प्रतिनिधी उपस्‍थित राहतील. गेल्‍या वर्षीच्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्‍सिस दिब्रिटो यांचीही उपस्‍थिती राहील. एकमताने संमेलनाध्यक्षपदाची निवड होण्याची शक्‍यता असली तरी, मतांतराच्‍या परिस्‍थितीत आवाजी मतदानातून निवड केली जाणार असल्‍याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

महामंडळाच्या बैठकीत पहिल्या दिवशी साहित्‍य संमेलनाच्‍या तारखा व चर्चासत्राच्‍या विषयांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीस ठाले-पाटील यांच्‍यासह विलास मानेकर (नागपूर), मिलिंद जोशी (पुणे), उषा तांबे (मुंबई), उपाध्यक्ष कपूर वासनिक (विलासपूर, छत्तीसगड), कार्यवाह दादा गोरे व कोशाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे (औरंगाबाद) यांच्‍यासह नाशिकचे माजी आमदार हेमंत टकले, लोकहितवादी मंडळाचे मुकुंद कुलकर्णी, शंकर बोऱ्हाडे उपस्‍थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For post of Sahitya Sammelan President Voting if not unanimous nashik marathi news