esakal | फळभाज्यांचा राजा बटाटा वधारला! नवरात्रोत्सवाच्या उपवासामुळे बटाट्याचे भाव आणखी वाढणार; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

potato.jpg

जागतिक उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादनामुळे चीन जगात आघाडीवर आहे. राज्यात त्या तुलनेत अत्यल्प बटाटा लागवड होते. पुणे, मंचर, पारेगाव, लातूर, कळवण, बागलाण, लोणी, जळगाव आदी भागात बटाटा लागवडीचे प्रयोग होत आहेत. पुणे परिसरात बटाट्याचे पावसाळी पीक घेतात. तेथील बटाटा काढणीला आला आहे.

फळभाज्यांचा राजा बटाटा वधारला! नवरात्रोत्सवाच्या उपवासामुळे बटाट्याचे भाव आणखी वाढणार; वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : देशात गेली तीन वर्षे बटाट्याच्या विक्रमी उत्पादनामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. वर्षभर बटाटा १० ते २० रुपये किलो दरानेच विक्री झाला. यामुळे यंदा बटाट्याची लागवड घटली. उत्पादनात घट झाल्याने गृहिणींच्या परडीतील फळभाज्यांचा राजा बटाटा सप्टेंबरच्या प्रारंभीच वधारला.

नवरात्रोत्सवाच्या उपवासामुळे बटाट्याचे भाव आणखी वाढणार

किरकोळ बाजारात ४० रुपये प्रतिकिलोने, तर प्रमुख महानगरात ५० रुपये किलो दराने बटाटा विक्री होत आहे. आगामी काळात नवरात्रोत्सवाच्या उपवासामुळे बटाट्याचे भाव आणखी वाढतील. डिसेंबरपर्यंत नवीन बटाटा बाजारात येईपर्यंत दरातील तेजी कायम असेल. येथील बाजार समितीत रोज पाच ट्रक बटाटा उत्तर प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेशातून विक्रीसाठी येतो. ठोक विक्रीचे दर २८ ते ३० रुपये प्रतिकिलो असल्याचे ठोक व्यापारी दीपक पाटील व नीलेश लिंगायत यांनी ‘सकाळ’ला सांगितले. येथील बाजारातून कळवण वगळता संपूर्ण कसमादेत व चांदवड, नांदगाव भागात बटाटा विक्रीसाठी जातो. येथून रोज ३५ ते ४० टन बटाट्याची विक्री होते. यंदा प्रथमच बटाटा उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून, आहे त्या परिस्थितीत बटाटा विक्रीसाठी जात आहे. उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांतही शीतगृहात बटाट्याचा साठा कमी असून, बटाट्याचे दर ६० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सेंद्रिय शेतीतील बटाटा ६० रुपये किलोने विक्री होतो. 

भारत बटाटा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर
देशात ४५ मिलियन टन बटाटा उत्पादन होते. जगभरातील उत्पादनात हे प्रमाण १२ टक्के असून, भारत बटाटा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये प्रतिवर्षी ९६ मिलियन टन बटाटा उत्पादन होते. जागतिक उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादनामुळे चीन जगात आघाडीवर आहे. राज्यात त्या तुलनेत अत्यल्प बटाटा लागवड होते. पुणे, मंचर, पारेगाव, लातूर, कळवण, बागलाण, लोणी, जळगाव आदी भागात बटाटा लागवडीचे प्रयोग होत आहेत. पुणे परिसरात बटाट्याचे पावसाळी पीक घेतात. तेथील बटाटा काढणीला आला आहे. या भागातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगले उत्पादन व चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. बागलाण तालुक्यातील भाजीपाला लागवड होणाऱ्या पश्‍चिम पट्ट्यातील आसखेडा, ताहाराबाद भागात बटाटा लागवडीचे प्रयोग होत आहेत. तीन महिन्यांत बटाट्याचे पीक हाती येते. भारतातून काही देशांत बटाटा निर्यात केला जातो. नेपाळला सर्वाधिक बटाटा निर्यात होतो. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

बटाटा उत्पादक प्रथम दहा राज्ये : 
उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, आसाम, कर्नाटक, हरियाना, झारखंड. 

प्रमुख उत्पादक दहा देश : 
चीन, भारत, रशिया, युक्रेन, युनायटेड स्टेट, जर्मनी, बांगलादेश, पोलंड, फ्रान्स, नेदरलँड. 
---- 
भारतातून बटाटा निर्यात होणारे देश : 
नेपाळ, ओमान, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, मॉरिशस, मालदीव, कुवेत, यूएई, सेशल्स. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

बटाटा बहुगुणी, बहुउपयोगी आहे. जगभरात त्याचा वापर होतो. नवीन लागवड झालेला कच्चा बटाटा डिसेंबरअखेरीस बाजारात येईल, तोपर्यंत बटाटा दरातील तेजी कायम असेल. येथील बाजारात जानेवारी-फेब्रुवारी मध्य प्रदेशातील, फेब्रुवारी-मार्च गुजरात, तर एप्रिल ते डिसेंबर या काळात उत्तर प्रदेश व गुजरातमधील बटाटा विक्रीला येतो. यूपीतील फारुखाबाद, समशाबाद, खंडोली, आग्रा, हाथरस, कुंडोल, तर गुजरातच्या डिसा, विजापूर येथून बटाटा येतो. -दीपक पाटील, बटाटा घाऊक व्यापारी, मालेगाव 

बटाट्याचा सर्व भाज्यांमध्ये वापर होतो. त्यापासून शेकडो पदार्थ साकारतात. नवरात्रोत्सवाच्या उपवास काळात बटाटा मागणी वाढेल. यामुळे भाव कायम राहतील. या वर्षी कमी प्रमाणात लागवड झाल्याने दरात तेजी आहे. यापूर्वी आम्हाला बटाटा व्यापारी प्रतीचे फोटो टाकत असत. मागणी व दर वाढल्याने आहे त्या परिस्थितीत बटाटा मागवत आहोत. -नीलेश लिंगायत, बटाटा घाऊक व्यापारी, मालेगाव