प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत साडेदहा कोटींचे अनुदान वितरित 

विक्रांत मते
Saturday, 17 October 2020

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत तीन वर्षांत महापालिकेकडे २७ हजार २९३ महिलांची नोंद झाली असून, त्याअंतर्गत साडेदहा कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

नाशिक : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत तीन वर्षांत महापालिकेकडे २७ हजार २९३ महिलांची नोंद झाली असून, त्याअंतर्गत साडेदहा कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रसूतीपूर्वी व नंतर पहिल्या बाळासाठी मातेला विश्रांती मिळावी, बुडित मजुरीचा लाभ होण्याच्या दृष्टीने मातृवंदना योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत गरोदर व स्तनदा मातांना रोख पाच हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जातात. पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांत गरोदरपणाची तारीख नोंदणी केल्यानंतर एक हजार, दुसरा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर गर्भधारणेची सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दोन हजार व तिसरा हप्ता. प्रसूतीनंतर अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी ओपीव्ही डीपीटीए, पेनटाव्हिलेट व लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

महापालिकेच्या शहरातील सर्व आरोग्य केंद्रांमार्फत ही योजना राबविण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर जानेवारी २०१७ ते २०२० यादरम्यान २७ हजार २९३ नोंदणी झाली. त्याचप्रमाणे एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० या चार महिन्यांत एकूण दोन हजार ५९५ नोंद झाली. तीन वर्षांत एकूण दहा कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.  

 हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pradhan mantri matruvandana yojana nashik marathi news