esakal | सीसीटीव्हीच्या निगराणीत असणार स्मशानभूमी अन् दफनभूमीही...कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

radhakrushna game.jpg

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्यात एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला किती गर्दी असावी, याबाबतही नियमावली असताना ते नियम पाळले जात नसल्याने अखेर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

सीसीटीव्हीच्या निगराणीत असणार स्मशानभूमी अन् दफनभूमीही...कारण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्यात एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला किती गर्दी असावी, याबाबतही नियमावली असताना ते नियम पाळले जात नसल्याने अखेर महापालिकेने स्मशानभूमी व दफनभूमीच्या प्रवेशद्वारावर खास उपाययोजना करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 

संसर्ग टाळण्यासाठी तोडगा

शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून, शनिवारी (ता. 23) दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आकडा 69 पर्यंत पोचला आहे. आतापर्यंत जे रुग्ण आढळले त्यातील एक रुग्ण नवी मुंबई येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला गेल्याने 53 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. एक महिला मालेगाव तालुक्‍यातील चिंचगव्हाण येथे अंत्यविधीला गेल्याने सातपूर भागातील दहा लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्याशिवाय शहरातील स्मशानभूमी व दफनभूमीत होणाऱ्या अंत्यसंस्काराला वीसपेक्षा अधिक लोक उपस्थित राहात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत असल्याने या समस्येवर नागरिकांकडून तोडगा निघत नव्हता. अखेरीस महापालिकेने अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही बघा > VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल

शासनाच्या निर्देशानुसार अंत्यसंस्काराला वीस लोक राहणे अपेक्षित असताना त्यापेक्षा जास्त लोक उपस्थित राहातात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल, तर नियम कडक करावेच लागणार आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका  

हेही वाचा > धक्कादायक प्रकार! "माझ्या वडिलांनी जिथे आत्महत्या केली.. त्याच पुलावर आहे मी" असे सांगत युवकाने केले असे