esakal | हा कसला प्रांतवाद..आंध्र प्रदेश व बिहारमधील मजुरांना प्राधान्य...मराठी मजुरांना मात्र घरचा रस्ता?
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown kamgar.jpg

कोरोनाच्या काळात मजूर मिळणे अवघड असताना रोजीरोटीसाठी मराठी मजूर कामासाठी भिडले खरे; परंतु येथे प्रांतवादाचा सामना करावा लागला. आठऐवजी बारा तास काम करणे, निकृष्ट दर्जाचे जेवण देणे, मजुरांमध्ये वेतन मिळत नसल्याची भीती घालून देणे, दमदाटी करण्याचा अनुभव नाशिकमधील मजुरांना आला.

हा कसला प्रांतवाद..आंध्र प्रदेश व बिहारमधील मजुरांना प्राधान्य...मराठी मजुरांना मात्र घरचा रस्ता?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नागपूर ते मुंबईपर्यंतच्या बहुचर्चित समृद्धी महामार्गावर काम करताना प्रांतवादाचा मुद्दा समोर आला आहे. आंध्र प्रदेश व बिहारमधील मजुरांना प्राधान्य देताना मराठी मजुरांना मात्र घरचा रस्ता दाखविला जात असल्याने लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या मंदीच्या परिस्थितीत काम असतानादेखील घरी बसण्याची वेळ कामगारांवर आली आहे. 

हा कसला प्रांतवाद..मराठी मजुरांना मात्र घरचा रस्ता?

मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम भाजप सरकारच्या काळात सप्टेंबर २०१९मध्ये सुरू झाले. एकूण सोळा टप्पे असलेल्या या कामापैकी १३ ते १५ टप्पे नाशिक जिल्ह्यातून तर, सोळावा टप्पा ठाणे जिल्ह्यातील कसारा ते शहापूरदरम्यान आहे. दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर १२० मीटर रुंदीचे सहापदरी महामार्ग, १२० ते १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालविण्याची क्षमता व अठरा नवनगरे वसविले जाणार आहेत. संपूर्ण महामार्गाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ॲपकॉस कंपनीला देण्यात आले आहे. जलदगतीने काम सुरू असताना एप्रिल व मेमध्ये लॉकडाउनमुळे काम थांबवावे लागले. तर, जूनच्या प्रारंभी कामाला पुन्हा सुरवात करण्यात आली. परंतु कोरोनाच्या भीतीने परप्रांतिय कामगार गावी परतल्याने कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले.

नाशिकमधील मजुरांनी थेट नाशिक गाठले. 

टप्पा क्रमांक सोळामध्ये तब्बल १,४०० मजुरांची निकड भासू लागल्याने ठेकेदार नियुक्त करण्यात आले. ठेकेदारांकडून मजुरांची शोधाशोध सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, हरसूल ते थेट सटाणा येथून मजूर आणून कामाला सुरवात करण्यात आली. कोरोनाच्या काळात मजूर मिळणे अवघड असताना रोजीरोटीसाठी मराठी मजूर कामासाठी भिडले खरे; परंतु येथे प्रांतवादाचा सामना करावा लागला. आठऐवजी बारा तास काम करणे, निकृष्ट दर्जाचे जेवण देणे, मजुरांमध्ये वेतन मिळत नसल्याची भीती घालून देणे, दमदाटी करण्याचा अनुभव नाशिकमधील मजुरांना आल्याने त्यांनी बाडबिस्तरा गुंडाळून थेट नाशिक गाठले. 

हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा

आंध्र-बिहारी मॅनेजमेंट 
समृद्धी महामार्गाचे काम मिळालेल्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये ८० टक्के आंध्र प्रदेश व बिहारमधील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचा त्या-त्या भागातील मजुरांना कामे मिळवून देण्यासाठी आटापिटा चालल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. 

हेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क

तक्रार केल्यानंतर दाद मिळाली नाही.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मजुरांची गरज असल्याचे निरोप आल्यानंतर शहापूर येथे पोचलो. काही दिवस काम केले; परंतु वेतन न देणे, निकृष्ट दर्जाचे जेवण, बारा तास काम करून घेतले गेले. मॅनेजमेंटकडे तक्रार केल्यानंतर दाद मिळाली नाही. अधिकाऱ्यांनीदेखील दुर्लक्ष केले. -सागर जगताप, कळवण