असं देशप्रेम दुर्मिळच! गावच्या शहीद जवानाचे अधुरे स्वप्न 'ते' पूर्ण करणार; करताय रात्रीचा दिवस

बापूसाहेब वाघ
Thursday, 21 January 2021

नेऊरगाव येथील जवळपास ५० शेतकरीपुत्र सैन्यदलात दाखल होण्यास इच्छुक असून, त्यानुसार वर्ष-दोन वर्षांपासून सर्व तरुण स्वयंस्फूर्तीने दररोज सायंकाळी नित्यनेमाने एकत्रितपणे येऊन दोन तास जिद्दीने व शिस्तबद्धपणे भरतीची जोरदार तयारी करत आहेत. 

मुखेड (नाशिक) : भारतमातेची सेवा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सैन्यदलात दाखल झालेले नेऊरगाव (ता. येवला) येथील गुलाब संपत कदम वयाच्या २३ व्या वर्षी (४२६ फील्ड अॅम्ब्युलन्स) सियाचीन ग्लेशर येथे कर्तव्य बजावताना देशासाठी शहीद झाले होते. कुटुंब, गावासाठी तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यास जिव्हारी लागलेल्या या दुर्दैवी घटनेस २७ डिसेंबर २०२० ला १९ वर्षे पूर्ण झाली. शहीद झालेल्या या भूमिपुत्राचे देशसेवा करण्याचे अधुरे असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांचा एकच ध्यास...

एकच ध्यास...

देशसेवेत जाण्यासाठी या तरुणांनी नेऊरगाव ते एरंडगाव या रस्त्यावर चार ते पाच किलोमीटर रनिंगचा सराव, शहीद जवान गुलाब कदम प्रवेशद्वार असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात प्रकाशझोतात व्यायाम, डबल बार, सिंगल बार, शिस्तबद्ध कवायती साकारतात. व्यायामाचे साहित्य प्रशासनाकडून उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली. सैन्यात भरती व्हायचेच, या उद्देशाने शेतीकामे करून व्यायामाबरोबर अभ्यासाला वेळ देतात. भरतीसाठी जाऊन आलेल्या काही ठराविक तरुणांच्या स्वअनुभवाच्या जोरावर व मार्गदर्शनाखाली स्वयंस्फूर्तीने स्वतःच भरतीपूर्व प्रशिक्षणाची जय्यत तयारी करत आहे, हे विशेष. भरतीस आलेल्या स्वअनुभवाने प्रशिक्षकाची भूमिका श्याम साठे हा तरुण करीत आहे.

जवळपास ५० तरुण सैन्यदल व पोलिसभरतीची तयारीला 

धीरज कदम, प्रमोद बोराडे, उमेश बोराडे, हृषीकेश कदम, सुमीत गाडे, गणेश बोराडे, संजय ठोंबरे, समीर तांबोळी, शुभम कदम, पंकज कदम, हृषीकेश कदम, विनय बोराडे, आनंदा कदम, मयूर कदम, सुदर्शन बोराडे, सूरज कदम, अर्जुन कदम, गोरख कदम, पुष्कर कदम, तेजस कदम, अरविंद कदम, रोहित थोरात, वैभव बोराडे, प्रसाद कदम, सागर जिरे, अमोल वरे, निरंजन कदम आदींसह जवळपास ५० तरुण सैन्यदल व पोलिसभरतीची तयारी करीत आहे. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

सैन्य दलात कार्यरत असलेले नेऊरगावचे भूमिपुत्र...
 
रवी देशमुख व शीतल देशमुख हे बहीण-भाऊ, तसेच दिनकर कदम, योगेश बोराडे, गोरख मुसळे, प्रवीण बोराडे, राहुल कदम, वैभव कदम, अजय कदम आदी भूमिपुत्र सैनिक, तर योगेश बोराडे हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत.  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for army recruitment by youth of Neurgaon nashik marathi news