उद्योगांतील कोरोना रुग्ण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय...वाचा सविस्तर

सतिश निकुंभ
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नाशिक जिल्ह्यातील उद्योगांत आतापर्यंत पाचशे रुग्ण वाढले, तसेच सात युनियन पदाधिकाऱ्यांसह काही कामगारांचा जीव गमावल्याच्या घटना समोर आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उद्योग संघटनांना कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश देत, हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा दिला. 

नाशिक : (सातपूर) नाशिक जिल्ह्यातील उद्योगांत आतापर्यंत पाचशे रुग्ण वाढले, तसेच सात युनियन पदाधिकाऱ्यांसह काही कामगारांचा जीव गमावल्याच्या घटना समोर आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उद्योग संघटनांना कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश देत, हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा दिला. 

कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी मांढरे यांनी उद्योग संघटनांची बैठक घेऊन उद्योगांमध्ये कोरोनाचा वेगाने होणाऱ्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त करतानाच उद्योगांना मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याची तंबी दिली. सातपूर व अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सातपूर एमआयडीसीतील कॅपॅसिटर बनविणाऱ्या कंपनीत ४५ कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यावर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. 

पाच पथकांची नियुक्ती

जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांत लॉकडाउन करण्याचे नियोजन नाही; मात्र कोरोनाचा फैलाव होतच राहिला तर नाइलाजाने कारवाई करावी लागेल, असे श्री. मांढरे यांनी बजावले. कंपनी प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत काटेकोर काळजी घेणे, सुरक्षेच्या उपाययोजना राबविणे बंधनकारकच असल्याचे स्पष्ट करीत उद्योगांमध्ये तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

...अशी आहेत पथके 

सातपूर औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसीचे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक एस. एम. भडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक प्रकाश घुगे, कामगार उपायुक्त कार्यालयाचे दुकाने निरीक्षक एल. बी. दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबड औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसीचे शकील शेख, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे, पवार यांची, सिन्नरसाठी
प्रकार युगे, हो. पो. जोशी, इगतपुरी-दिंडोरी, कळवण औद्योगिक क्षेत्रासाठी धी. रा. शिरोडकर, वि. र . झांबरे यांची, तर मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा, निफाड, येवला या भागासाठी अ. स. चौधरी, क. तो. झोपे, डमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके त्या त्या उद्योग क्षेत्रात भेटी देऊन तेथील व्यवस्था आदींबाबत पाहणी करून अहवाल सादर करणार
आहेत.  

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To prevent corona patients in the industry Five flying squads from the Collector nashik marathi news