दैनंदिन भाज्यांच्या नियोजनातून टोमॅटो होणार गायब..? हे आहे कारण

tomatoes.jpg
tomatoes.jpg

नाशिक : (पिंपळगावं बसवंत) लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक असून ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. परंतू हे टोमॅटो दैनंदिन भाज्यांच्या नियोजनातून गायब होणार कारण...

टोमॅटो किलोला 80 रूपये

तीन महिन्यापासुन घोंगावणारे कोरोनाचे संकटाने टोमॅटोची आगाप लागवड घटली. त्यात पावसाच्या सरी कोसळल्याने टोमॅटोच्या रोपावर रोगांचा विळखा पडल्यामुळे आगाप लागवडीचे उत्पादन घटले आहे. बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने टोमॅटोचे दर प्रचंड वधारले आहे. वीस किलो टोमॅटोच्या कॅरेटला पिंपळगावं बसवंत, नाशिक, नारायणगांव बाजार समितीत 900 रूपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजार टोमॅटो भाव खात असुन दराने 80 रूपयांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे दैनंदिन भाज्यांच्या नियोजनातुन टोमॅटो गायब होणार आहे. टोमॅटोबाबतही कोरोनाविषयी अभावाचा बाजार भरला होता. त्यामुळे अगोदरच धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या लागवडीकडे पाठ फिरविली. जेथे रोपांची लागवड झाली तेथे पावासाने रोगांच्या प्रार्दुभाव झाला. त्यामुळे नाशिक, पिंपळगांव बसवंत बाजार समितीत टोमॅटोची आवक घसरली आहे. पिंपळगावमध्ये आज अवघे 55 कॅरेट विक्रीसाठी आले. 

आवक घटली...

आवकमध्ये घट झाल्याने बाजारभावात मोठी उसळी आली आहे. 20 किलोचे क्रेटला 900 रूपयेपर्यत दर मिळत आहे. गुजरातसह परराज्यात हा टोमॅटो विक्रीसाठी पाठविला जात असुन वाहतुकीस इतर खर्च पाहता किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 ते शंभर रूपये किलोपर्यंत पोहचले आहे. अर्थात टोमॅटोचा मुख्य हंगाम सुरू व्हायला महिनाभराचा अवधी आहे. त्यामुळे सध्या विक्रीसाठी येत असलेला टोमॅटो दुय्यम दर्जाचा आहे.

शिमला मिरचीचे दरही कडाडले

आगाप लागवड कमी झाल्याने पुढील दोन महिने आवक कमी राहणार आहे. सध्या मिळणारा आकर्षक दर पाहता शेतकरी टोमॅटो लागवड वाढणार आहे. श्रावण महिन्यात टोमॅटोची लागवड वाढणार आहे. सप्टेंबर महिन्यात टोमॅटोची आवक वाढणार आहे. टोमॅटो बरोबरच शिमला मिरचीचे दरही कडाडले आहे. 11 किलोच्या कॅरेटला 500 रूपये दर मिळत आहे.

सध्या टोमॅटोची आवक अत्यल्प असून त्या तुलनेत मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात ही तेजी दिसून येत आहे. पुढील दोन महिने तरी दर उंच राहतील अशी अपेक्षा आहे. - नितीन सोनवणे, (राधाकृषण व्हेजीटेबल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com