esakal | टोमॅटोच्या दराची वाटचाल हजाराकडे! गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक निम्मीच
sakal

बोलून बातमी शोधा

tomato 1.jpg

परराज्यातील टोमॅटोच्या हंगामावर अतिपावसाने पाणी फिरविले. गुवाहाटी, उत्तर प्रदेश, बिहार तर महाराष्ट्रातील नारायणगाव येथील हंगाम वाया गेले. बेंगळुरूर, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे टोमॅटो अत्यल्प प्रमाणात बाजारात येत आहेत. त्यामुळे बांगलादेशसह देशांतर्गत टोमॅटोच्या पुरवठ्याची सर्व भिस्त नाशिक जिल्ह्यावर आहे

टोमॅटोच्या दराची वाटचाल हजाराकडे! गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक निम्मीच

sakal_logo
By
दीपक अहिरे

नाशिक / पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या धास्तीने लागवडीत झालेली घट, त्यामुळे घटलेली आवक व त्या तुलनेत वाढलेली मागणी, यामुळे टोमॅटोच्या दराने उंच झेप घेतली आहे. पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी २० किलोच्या प्रतिक्रेटला भाव मिळाला. टोमॅटोच्या दराची वाटचाल एक हजार रुपये प्रतिक्रेटच्या दिशेने सुरू आहे. एकाच दिवसात ४० लाख रुपयांची उलाढाल पाहता टोमॅटोने लाल क्रांती केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक निम्मीच; बांगलादेशमधून मागणी 

बांगलादेशमध्ये दररोज २०० टन टोमॅटो निर्यात होत असल्याने टोमॅटोच्या दरालाही चमक आली आहे. पिंपळगाव बसवंत व लासलगाव बाजार समितीत टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आवकेत निम्म्याने घट झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पिंपळगाव बाजार समितीत दररोज टोमॅटोचे किमान एक लाख क्रेट विक्रीसाठी आले आहेत. पिंपळगाव बाजार समितीत अवघे ५० हजार क्रेट विक्रीसाठी आले. सरासरी ६४१, तर कमाल ८५१ रुपये प्रतिक्रेट असा आकर्षक दर मिळाला.

बांगलादेशमध्ये होत असलेल्या निर्यातीने दर भडकले

परराज्यातील टोमॅटोच्या हंगामावर अतिपावसाने पाणी फिरविले. गुवाहाटी, उत्तर प्रदेश, बिहार तर महाराष्ट्रातील नारायणगाव येथील हंगाम वाया गेले. बेंगळुरूर, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे टोमॅटो अत्यल्प प्रमाणात बाजारात येत आहेत. त्यामुळे बांगलादेशसह देशांतर्गत टोमॅटोच्या पुरवठ्याची सर्व भिस्त नाशिक जिल्ह्यावर आहे. बांगलादेशमध्ये दररोज जाणाऱ्या सात ते दहा ट्रकमधून सुमारे १०० टन टोमॅटो पोचत आहे. बांगलादेशमध्ये होत असलेल्या निर्यातीने दर भडकले आहेत. 
 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

टोमॅटोची घटलेली आवक पाहता टोमॅटोच्या दरात तेजी अपेक्षित होती. परराज्यातील टोमॅटोच्या हंगामावर पाणी फिरले आहे. टोमॅटोचे दर यंदा मागील सर्व विक्रम मोडतील, अशी स्थिती आहे. -सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल, पिंपळगाव बसवंत 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप\

संपादन - ज्योती देवरे