जिल्ह्यात अग्निशमन यंत्रणा फक्त नावालाच; ११० प्राथमिक आरोग्य केंद्रांची धक्कादायक वस्तुस्थिती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या कक्षास आग लागून दहा बालके दगावली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या.

नाशिक : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या ११० प्राथमिक आरोग्य केंद्रांत आतापर्यंत फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव या ठिकाणी केंद्र सुरू झाल्यानंतर अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच मॉकड्रिलद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिलेले नाही. त्यामुळे महिन्याभरात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण देऊन अहवाल शासनास पाठविला जाणार आहे. 

जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्निशमन यंत्रणा

भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या कक्षास आग लागून दहा बालके दगावली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणेबाबत माहिती मागविण्यात आली होती. या पत्रावरून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती शासनास जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्निशमन यंत्रणा आहे. तसेच जिल्ह्यात मागील पाच वर्षांमध्ये एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात आग लागली नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

फायर सेफ्टी ऑडिट महिनाभरात करून घेण्याच्या सूचना

शासनाच्या सूचनेनुसार या यंत्रणेचे फायर सेफ्टी ऑडिट महिनाभरात करून घेण्याच्या सूचना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व आरोग्य केंद्रांच्या इमारतींची बांधकाम संरचना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी मॉकड्रिल करून घेण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नमूद केले आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Primary Health Center Away from fire audits nashik marathi news