किसान सन्मान योजनेचे असन्मानीय लाभार्थी! बोगस लाभार्थींनी लाटला लाखोंचा निधी; वसुली होणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

गाव नमून नंबर 6, फेरफार रजिस्टर उतारा व सातबारासह याबाबत अहवाल सादर केला जाईल असे श्री. राजपूत यांनी सांगितले. तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसिलदारांवर वसुलीची जबाबदारी आहे. त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले असून स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. 

नाशिक : (मालेगाव) प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या 56 हजार शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील तब्बल एक हजार 12 बोगस लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. योजनेच्या पोर्टलवरुन ही माहिती प्राप्त झाली. बोगस लाभार्थ्यांकडून वसुली सुरु करण्यात आली आहे. 

तब्बल 95 लाख 38 हजाराची होणार वसुली

करावयाची आहे. पहिल्याच दिवशी 16 हजार रुपयांची वसुली झाल्याचे तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी सांगितले. बोगस लाभार्थ्यांकडून लवकरात लवकर रक्कम वसूल करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे. बोगस लाभार्थ्यांनी रक्कम न भरल्यास लाभार्थ्यांच्या सातबारा उताऱ्यावर रक्कमेचा बोजा लावण्यात येईल. गाव नमून नंबर 6, फेरफार रजिस्टर उतारा व सातबारासह याबाबत अहवाल सादर केला जाईल असे श्री. राजपूत यांनी सांगितले. तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसिलदारांवर वसुलीची जबाबदारी आहे. त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले असून स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

बोगस लाभार्थींकडून वसुली सुरु

केंद्राने दोन वर्षापुर्वी किसान सन्मान योजना सुरु केली. या योजनेच्या अर्टी शर्तीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा होत आहेत. तालुक्यात 56 हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले. योजनेच्या पोर्टलवर मिळालेल्या माहितीवरुन यातील एक हजार 12 लाभार्थी बोगस आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यावरील 95 लाख 38 हजार रुपये वसुल करावयाचे आहेत. संबंधित तलाठींना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Kisan Sanman Recovery started from bogus beneficiaries nashik marathi news