पंचाहत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव..नेमके कारण काय? 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याऐवजी खासगी अतिक्रमण कारवाईला अधिक प्राधान्य दिले जाते. नाशिक रोड विभागात तर सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. अनेक वर्षांपासून एकाच जागेवर कार्यरत असल्याने अतिक्रमणधारकांशी हितसंबंध तयार झाल्याने एकंदरीत कायम वादग्रस्त राहिलेल्या या विभागाची पुनर्रचना आवश्‍यक असल्याचे प्रशासनाचे ठाम मत झाले

नाशिक : अनेक वर्षांपासून अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजात मरगळपणा आल्याबरोबरच काही कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमणांना अभय दिले जात असल्याने या विभागातील 75 कर्मचाऱ्यांच्या इतर विभागात बदल्या करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात मुख्यालयातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

अतिक्रमण विभागात हितसंबंधांच्या तक्रारी 

शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून, त्याला या विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच अभय मिळत असल्याचा वारंवार आरोप केला जातो. काही महिन्यांत अतिक्रमण विभागातील गैरप्रकार समोर आले होते. जेल रोड भागातील एका खासगी जागेवरचे अतिक्रमण हटविण्यासाठी नाशिक रोड विभागातील अतिक्रमण विभागाने दाखविलेली तत्परता, मेन रोड व मुख्य बाजारपेठेतील फेरीवाल्यांना मिळणारे अभय, वारंवार अतिक्रमण विभागाकडून कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याच जागांवर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याऐवजी खासगी अतिक्रमण कारवाईला अधिक प्राधान्य दिले जाते. नाशिक रोड विभागात तर सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

अनेक वर्षांपासून एकाच जागेवर कार्यरत असल्याने अतिक्रमणधारकांशी हितसंबंध तयार झाल्याने एकंदरीत कायम वादग्रस्त राहिलेल्या या विभागाची पुनर्रचना आवश्‍यक असल्याचे प्रशासनाचे ठाम मत झाले. या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करून अन्य विभागातील कर्मचारी अतिक्रमण विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव अतिक्रमण उपायुक्त राहुल पाटील यांनी प्रशासन विभागाकडे सादर केला आहे. अतिक्रमण विभागातील 70 कर्मचारी, मुख्यालयातील चार, तर एका सहाय्यक अधीक्षकाच्या बदलीचा प्रस्ताव आहे. 

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत

बदली स्थगितीसाठी दबाव 
बदल्यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु यापूर्वीदेखील पूर्वीच्या आयुक्तांकडे बदल्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आहे. त्या मुळे बदलीचे प्रस्ताव धूळखात असल्याचे बोलले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for transfer of seventy-five employees Nashik Marathi News