खबरदार! मंगळसूत्राला हात लावाल तर... काय होईल माहित आहे?

राजेंद्र अंकार : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांना अनेक क्षेत्रांत काम करावे लागते. विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मंगळसूत्र खेचण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अनेकदा चोरटेही सापडत नाहीत. याच अनुषंगाने येथील चांडक कन्या विद्यालयतील सातवीतील विद्यार्थिनी रेणुका किशोर सहाणे हिने असे उपकरण बनविले...की सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

नाशिक : सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांना अनेक क्षेत्रांत काम करावे लागते. विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मंगळसूत्र खेचण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अनेकदा चोरटेही सापडत नाहीत. याच अनुषंगाने येथील चांडक कन्या विद्यालयतील सातवीतील विद्यार्थिनी रेणुका किशोर सहाणे हिने इलेक्‍ट्रॉनिक मंगळसूत्र बनविले आहे.

खबरदार! मंगळसूत्राला हात लावाल तर..

हे मंगळसूत्र तयार करताना तिने बनावट मंगळसूत्र नमुना म्हणून वापरले. त्यात मनी ओवण्यासाठी छोटा व्यास असलेली विद्युत सुवाहक तांब्याची तार वापरली. मंगळसूत्रामागे मानेच्या पाठीमागे एका छोट्या आयताकृती पेटीत तीन ते चार व्होल्ट इतका विद्युत निर्माण करणारा घट वापरला आहे. तीन ते चार व्होल्ट मानवास कुठल्याही प्रकारची हानी पोचवत नाही. त्यासोबत एक प्रोग्राम सर्किट बोर्ड आहे. ते मंगळसूत्र परिधान करणाऱ्या महिलेने फक्त धोक्‍याची ठिकाणे ओळखून त्या सर्किटचे बटण सुरू करून घ्यायचे. त्या वेळेस एखाद्या चोरट्याने मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला, तर मंगळसूत्राच्या पार्श्‍वभागात जोडलेले दोन मनी (पॉझिटिव्ह व निगेटिव्ह) दोन्ही त्या व्यक्तीच्या स्पर्शामुळे एकत्र येतात व त्या चोरट्याला विजेचा झटका बसतो व तो चोर ते मंगळसूत्र क्षणार्धात सोडून देतो. मंगळसूत्राला विद्युत दुर्वाहक आवरण बसविले आहे, म्हणून मंगळसूत्र परिधान केलेल्या महिलेला त्याचा त्रासही होत नाही. अतिशय कमी खर्चात हे मंगळसूत्र तयार केले आहे.

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

मंगळसूत्र व रेणुकाचे सर्वत्र कौतुक

यासाठी रेणुकाला मुख्याध्यापिका माधवी पंडित, विज्ञान विषयप्रमुख दीपक बाकळे, शिक्षक धनलाल चौरे, राकेश नन्नावरे, मनीषा उकाडे, रेश्‍मा पवार, सहाय्यक यशवंत गोसावी, पालक किशोर सहाणे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. मंगळसूत्र व रेणुकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protective device made by a student of Chandak Kanya School Nashik Marathi News