येवल्यात प्रकाश आंबेडकर, गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध 

संतोष विंचू
Tuesday, 13 October 2020

आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘प्रकाश आंबेडर व गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार असो, त्यांच्यावर कारवाई झालीज पाहिजे’, अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

नाशिक/येवला : भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर व गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करीत सोमवारी (ता. १२) येवला येथे सकल मराठा समाजातर्फे छत्रपती उदयनराजे भोसले व संभाजीराजे हे समाजाचे दैवत आहेत. समाजासाठी त्यांनी भूमिका मांडली तर ते गैर नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह कोणी बोलत असेल तर सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला. 

आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘प्रकाश आंबेडर व गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार असो, त्यांच्यावर कारवाई झालीज पाहिजे’, अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. ॲड. प्रकाश आंबेडकर व गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करीत, त्यांच्यावर कारवाईच्या मागणीचे नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना निवेदन देण्यात आले. संजय सोमासे, निंबाजी फरताळे, रवी शेळके, सागर नाईकवाडे, नीलेश घायाळ, आदित्य नाईक, आजिंक्य नाईक, दत्तू सोमासे, आण्णा सोमासे, अतुल काथवटे, विशाल काथवटे, रोहिदास जाधव, अरविंद जोंधळे, प्रदीप भड, विशाल भुजाडे, ऋषिकेश भवर, सचिन भवर, कुष्णा कव्हात, युवराज पाटोळे, सौरभ सुकासे, नितीन जाधव, बाबा डांगे, सीताराम घोडेस्वार, दीपक बोबले, शरद पवार, आदेश काळे, प्रवीण निकम आदींनी निवेदन दिले.  

 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest against prakash ambedkar and sadavarte in yeola nashik marathi news