मालेगावमुळे 'त्यांच्या' मनातही शंकेची पाल चुकचुकत होती...अन् आढळलाच शेवटी पहिला पॉझिटिव्ह

kalwan 1111.jpg
kalwan 1111.jpg

नाशिक / कळवण : मालेगावात वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने कळवणकरांमध्येही शंकेची पाल चुकचुकत होती. मालेगावमध्ये पोचलेला कोरोना कळवणपर्यंत येऊ नये, म्हणून शहरवासीय विशेष खबरदारी घेत होते. प्रशासनही सज्ज होऊन आवश्‍यक उपाययोजना करीत होते. अखेर पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कळवण शहर व तालुक्‍यात 17 मेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून, कडेकोट लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. 13) झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. 

कळवणमध्ये 17 पर्यंत जनता कर्फ्यू 

14 ते 17 मेपर्यंत मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. 
बैठकीत व्यापारी व नागरिकांनी अडचणी मांडल्या. धनंजय पवार, विजय शिरसाठ, राजेंद्र भामरे, तहसीलदार कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक निरीक्षक उमाकांत गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, मोहनलाल संचेती, विलास शिरोरे, नितीन वालखडे, जयंत देवघरे, सागर खैरनार, व्यापारी महासंघाचे सदस्य उपस्थित होते. 
दरम्यान, सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदार बी. ए. कापसे यांना 17 मेपर्यंत तालुक्‍यात जनता कर्फ्यू पाळण्याचे निवेदन देण्यात आले.

मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद 
दरम्यान, मालेगावात वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने कळवणकरांमध्येही शंकेची पाल चुकचुकत होती. मालेगावमध्ये पोचलेला कोरोना कळवणपर्यंत येऊ नये, म्हणून शहरवासीय विशेष खबरदारी घेत होते. प्रशासनही सज्ज होऊन आवश्‍यक उपाययोजना करीत होते. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

रुग्णाची कुठलीही प्रवास हिस्ट्री नाही 
येथील शिवाजीनगरमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला कुठलीही प्रवास हिस्ट्री नसून, त्याचे वडील शासकीय सेवेत आहेत. सध्या ते मालेगावला कार्यरत असल्याने खबरदारी म्हणून दोन दिवसांपूर्वी पूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. मंगळवारी (ता. 12) प्राप्त झालेल्या अहवालात घरातील सर्व व्यक्ती निगेटिव्ह, तर 11 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यात कुठल्याही प्राथमिक लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र, रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com