...अन् 'त्यांच्या' रुपात क्वारंटाइन कुटुंबाला भेटले देवदूतच...वाचा काय घडले?

गौरव परदेशी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शेती सुजलाम सुफलाम् करून देत एक आदर्श निर्माण करून दिला. कोरोना महामारीच्या काळात या संकटात न डगमगता मदतीला धावून गेले. महामारीच्या काळात क्वारंटाइन कुटुंबाच्या मदत करत समाजापुढे माणुसकीचे दर्शन घडविले.

नाशिक : (खेडभैरव) आदिवासी समाज हा डोंगर, पाण्यात राहणारा समाज, भातशेती त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव पोक, अशातच पेंडशेत गावात कोरोनाचा शिरकाव झाला त्यामुळे एक आदिवासी कुटुंब क्वारंटाईन झाले. त्यामुळे, भात पिकाची आवणी (भात लागवड) करणार कोण? असा प्रश्न भेडसावत असतानाच ते देवदूतासारखे धावून आले अन् अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

कुटुंबाला मदत करण्याचा निर्धार

गावातील तरुण म्हटले की टवाळ व त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा मात्र याला (पेंडशेत ता. अकोले) गावांतील तरुण अपवाद ठरले. कोरोनाची लागण झाली म्हणून प्रशासनाने संपुर्ण कुटुंब क्वारंटाइन केले. आदिवासी शेतकरी बांधवाच्या वर्षातील कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव भात पीक व पावसाळ्यात भात लागवडीचा कालावधी संपुर्ण कुटुंब क्वारंटाईन मग त्या कुटुंबाच्या शेतीची लागवड करणार कोण अशावेळी गावांतील अक्षय पदमेरे, केशव वळे, सुनिल पदमेरे, विठ्ठल पदमेरे, गोपाळ पदमेरे, संतोष पदमेरे, लक्ष्मण पदमेरे,  भरत पदमेरे, सखाराम मुंढे, सुनील बांडे,निवृत्ती धादवड, मधुकर धादवड, विठ्ठल मुठे, नामदेव वळे या तरुणांनी एकत्र येऊन संबंधित कुटुंबाला मदत करण्याचा निर्धार केला. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

अन् घडले माणुसकीचे दर्शन

विनामोबदला भात लागवड (आवणी) करुन दिली. व कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे एकमेव पीक असणाऱ्या शेतीला जीवनदान दिले. शेती सुजलाम सुफलाम् करून देत समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला व कोरोना महामारीच्या काळात या संकटात न डगमगता मदतीला धावून जात त्या क्वारंटाइन कुटुंबाच्या मदतीचा हात दिला.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The quarantine family delivered a message of humanity by helping the villagers nashik marathi news