धक्कादायक! कोरोना प्रतिबंधक फलक काढून क्वारंटाईन कुटुंब फिरतयं गावभर; नागरिकांना भरली धडकी

भरत मोगल
Saturday, 19 September 2020

गावातील एका महिलेने घरावर ग्रामपंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना कमिटीने लावलेला कोरोना प्रतिबंधक फलक काढून गावभर फिरस्ती करत अनेकांना भेटही दिली. तिच्यासह कुटुंब क्वारंटाइन असतानाही त्यांनी हा प्रकार केल्याने संपर्कतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वाचा सविस्तर..​

नाशिक / कसबे सुकेणे :  गावातील एका महिलेने घरावर ग्रामपंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना कमिटीने लावलेला कोरोना प्रतिबंधक फलक काढून गावभर फिरस्ती करत अनेकांना भेटही दिली. तिच्यासह कुटुंब क्वारंटाइन असतानाही त्यांनी हा प्रकार केल्याने संपर्कतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वाचा सविस्तर..

क्वारंटाइन कुटुंबाची गावभर फिरस्ती 
कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील महिलेची ८ सप्टेंबरला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर कुटुंबाला क्वारंटाइन करण्यात आले. १३ सप्टेंबरला ही महिला घरी आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले. मात्र या महिलाने शासकीय नियमाचे पालन दोन दिवस करत १६ सप्टेंबरला ग्रामपंचायत कमिटी, प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना कमिटीने लावलेला कोरोना प्रतिबंधक फलक काढून टाकला. आपण जणू लगेच बरे झालो आहोत, या अविर्भावात बँक आणि ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कामेही केली. या महिलेचे कुटुंब विलगीकरणात असताना तिचा पतीही गावभर फिरला. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संपर्कातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण 
हे संपूर्ण कुटुंब निष्काळजीपणे शासनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर या कुटुंबाविरुद्ध कसबे सुकेणे पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. या कुटुंबाने शासकीय नियमांचे पालन करण्याची मागणी ग्रामस्थांनी करत पोलिस ठाण्यात रीतसर अर्ज दाखल केला. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine family outings around the village nashik marathi news