वगळलेल्‍या अभ्यासक्रमातील सीईटीमध्येही प्रश्‍न नाहीच; एमएचटी-सीईटी २०२१ साठी शंभर गुणांचे ३ पेपर 

Questions will not be asked from the reduced syllubus in the 2021 MHT CET exam nashik marathi news
Questions will not be asked from the reduced syllubus in the 2021 MHT CET exam nashik marathi news

नाशिक : कोविड-१९ च्‍या पार्श्वभूमीवर अध्ययन प्रक्रिया प्रभावित झालेली असताना परीक्षेकरिता अभ्यासक्रमातील काही भाग वगळण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता. त्‍यातच आगामी वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेकरिता वगळलेल्‍या अभ्यासक्रमातून प्रश्‍न विचारले जाणार नसल्‍याचे राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्‍पष्ट केले आहे. 

पीसीएम व पीसीबी या दोन्‍ही ग्रुपची स्‍वतंत्र परीक्षा

एमएचटी-सीईटी २०२१ च्‍या शिक्षणक्रमासंदर्भातील सूचना व मार्गदर्शकतत्त्वे सीईटी सेलतर्फे जारी करण्यात आले. त्‍यानुसार गणित विषयाचा पेपर एक, भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्र विषयावर आधारित पेपर क्रमांक दोन, तर जीवशास्‍त्रावर आधारित पेपर क्रमांक तीन, असे तीनशे गुणांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. यंदाप्रमाणेच पीसीएम व पीसीबी या दोन्‍ही ग्रुपची स्‍वतंत्र परीक्षा घेतली जाण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना दोन्‍ही ग्रुपची परीक्षा देण्याची संधी उपलब्‍ध असेल. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये बारावीत प्रविष्ट असलेल्‍या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा होणार आहे. दरम्‍यान, कोविड-१९ च्‍या प्रादुर्भावामुळे डिसेंबरपर्यंत बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये बंद होते व महाविद्यालयांकडून ऑनलाइन स्‍वरूपात अध्ययन प्रक्रिया राबविली जात होती. 

अकरावीच्‍या संपूर्ण अभ्यासक्रमांचा विचार

महाराष्ट्र राज्‍य पाठ्यपुस्‍तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी कोविड-१९ मुळे अभ्यासक्रमातील जो भाग वगळला असेल, त्‍यावर आधारित प्रश्‍न विचारले जाणार नसल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. इयत्ता अकरावी व बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होत असल्‍याने अकरावीच्‍या मात्र संपूर्ण अभ्यासक्रमांचा प्रश्‍नांसाठी विचार केला जाणार आहे. 


...असे असेल प्रश्‍नांचे स्‍वरूप 

गणित, भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये अकरावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्‍येकी दहा प्रश्‍न असतील. तर जीवशास्‍त्राच्‍या पेपरमध्ये अकरावीवर आधारित वीस प्रश्‍न राहाणार आहेत. शंभर गुणांच्‍या गणित विषयाच्‍या पेपरमध्ये प्रत्‍येकी दोन गुणांसाठी प्रश्‍न विचारला जाईल. भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्त्राच्या पेपर दोनमध्ये प्रत्‍येकी एक गुणासाठी दोन्‍ही विषयांचे प्रत्‍येकी पन्नास प्रश्‍न विचारले जातील. जीवशास्‍त्र विषयाच्‍या पेपरमध्ये प्रत्‍येकी एक गुणासाठी शंभर प्रश्‍न विचारले जाणार असून, यापैकी ८० प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com