esakal | सिन्नरला सर्व्हर डाऊनमुळे रेशन दुकानात रांगा; शेतकरी, मजुरांची होतेय परवड 
sakal

बोलून बातमी शोधा

Queue at ration shop

सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरीत करण्यात येणारे स्वस्त धान्य विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांची परवड सुरू असल्याचे चित्र सध्या आहे.

सिन्नरला सर्व्हर डाऊनमुळे रेशन दुकानात रांगा; शेतकरी, मजुरांची होतेय परवड 

sakal_logo
By
अजित देसाई

नाशिक/सिन्नर : दिवाळीचा सण तोंडावर आला असताना ग्रामीण भागात शेती कामाची लगबग सुरू आहे. घरात सणाची आवरासावर करतानाच शेताकडे ही लक्ष द्यावे लागत आहे. त्यातच रेशन सुटल्याने ते भरण्यासाठी देखील वेळ काढावा लागतो. मात्र, रेशन दुकानात 'सर्व्हर डाऊन' असल्याने आणि सर्व्हर डाऊनमुळे 'थम स्कॅनिंग' होत नसल्याने रेशनदुकानासमोर नागरिकांच्या रांगा लागल्या असून परिणामी कामधंदे सोडून दुकानांसमोर रांगा लावण्याची वेळ शेतकरी व शेतमजुरांवर आली आहे. 

वितरण यंत्रणेच्या 'सर्व्हर डाऊन' ची डोकेदुखी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरीत करण्यात येणारे स्वस्त धान्य विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांची परवड सुरू असल्याचे चित्र सध्या आहे. सदर धान्य विकत घेताना पॉस यंत्रावर नोंदणी करावी लागते. ही नोंदणी झाल्याशिवाय धान्य मिळत नाही. सध्या ग्रामीण भागात आयडियाच्या नेटवर्कची बोंबाबोंब असून या यंत्रांसाठी देखिल शासनाकडून याच कंपनीचे सिम कार्ड पुरवण्यात आले आहे. ऑनलाइन धान्य वितरण यंत्रणेच्या 'सर्व्हर डाऊन' ची डोकेदुखी त्रासात भर पाडणारी ठरली आहे. तास दोन तास प्रयत्न करूनही 'थम स्कॅनिंग' होत नसल्याने रेशनसाठी कामधंदे सोडून दुकानांसमोर रांगा लावण्याची वेळ शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्यांवर आली आहे. 
सध्या शेती कामांची लगबग आहे. पिकांच्या काढणीचे काम जोरात सुरू असून घराघरांमध्ये दिवाळी सणाची आवरासावर देखील केली जात आहे. मात्र रेशनसाठी या कामांना आडफाटा द्यावा लागत आहे. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

शासनाने रेशन वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी पॉस मशीनचा पर्याय आणला आहे. मात्र ऐन गर्दीच्या काळात सर्व्हर डाऊन होण्याचे व मोबाईल नेटवर्क जाम होण्याचे प्रकार मनस्ताप वाढवणारे आहेत. त्यात खोळंबा होत असल्याने ग्राहकांची ओरड सहन करावी लागते. 
- सतीश भुतडा, धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष (सिन्नर) 

धान्य वितरणसाठी केंद्र सरकारने थम् स्कॅनिंग सक्तीचे केले आहे. मोबाईल नेटवर्कच्या अडचणी, सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेक भागात ग्राहकांना मनस्ताप होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) च्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. एनआयसीकडून सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याचे काम सुरू असल्याने दोन दिवसात व्यवस्था सुरळीत होईल . 
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी 
 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

go to top