नाशिकमध्ये रेमेडिसिव्हर इंजेक्शनसाठी रांगा; ग्रामीण रुग्णांच्या नातेवाईकांची शहरात पायपीट

प्रमोद दंडगव्हाळ
Sunday, 20 September 2020

नाशिक शहरासह सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तेथील डॉक्टर रेमडेसिवियर इंजेक्शन प्रिस्क्राइब नोटवर लिहून देत आहेत.

नाशिक/सिडको : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या  "रेमेडिसिव्हर" या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शचा शोध घेण्यासाठी शहरातील मेडिकल व फार्मसीच्या दारोदारी भटकण्याची वेळ आल्याचे चित्र बघायला मिळाले. 

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात तुटवडा

नाशिक शहरासह सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तेथील डॉक्टर रेमडेसिवियर इंजेक्शन प्रिस्क्राइब नोटवर लिहून देत आहेत. शहरात ज्या ठिकाणी उपलब्ध असेल तेथून ते आणून डॉक्टरांना द्यावे लागते. गरजेप्रमाणे रुग्णांना इंजेक्शन देण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवियर इंजेक्शनचा नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. असाच काहीसा अनुभव रुग्णांच्या नातेवाइकांना दोन दिवसांपासून येतो आहे. जेथे इंजेक्शन उपलब्ध होते त्या ठिकाणी सकाळपासून नागरिकांना सदर फार्मसीला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नोट, कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट, आधार कार्डची झेरॉक्स सक्तीची करण्यात आली आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

टोकन पध्दतीने विक्री

रुग्णांविषयीची माहीती घेतल्यानंतर रुग्णांना टोकन दिले जाते. जस जसे इंजेक्शनचा स्टॉक्स उपलब्ध होईल तसे इंजेक्शन देण्यात येते. या प्रमाणात शनिवारी त्याची काही ठिकाणी विक्री करण्यात आली. अशीच काहीशी आपबीती चांदवड येथील एका रुग्णाच्या नातेवाईकावर घडून आली. गोविंद नगर येथील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याने संपूर्ण शहर पालथे घातले. पण त्याला काही कारे इंजेक्शन मळेनासे झाले. त्यामुळे तो हताश झाला. उमेद संपल्यानंतर सरतेशेवटी अंबड येथील एका मेडीकल मध्ये हे इंजेक्शन उपलब्ध झाले. इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता त्यांनी एक नव्हे तर चार इंजेक्शन एकदम घेऊन ठेवले. जेणेकरून उद्या परत आपल्यावर अशी आपबिती यायला नको ! आपल्या रुग्णाला कामात नाही आले तर ते दुसऱ्याला तरी देता येईल या उद्देशाने इंजेक्शन खरेदी होत असल्याने तुटवडा आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

रेमडेसिवियर इंजेक्शन रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णांच्या नातेवाइकांची हेळसांड थांबेल 
- पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक, चांदवड  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: queues in Nashik for remedicivir injection marathi news