आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश...'त्या' गोळ्यांचं गुजरात कनेक्शन..धक्कादायक खुलासा!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी स्थानिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कुत्ता गोळी विक्रीला चाप लागला पाहिजे. गोळी विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाल्यास युवा पिढी व्यसनापासून व शहर गुन्हेगारीपासून वाचेल. कुत्ता गोळीला सांकेतिक भाषेत बटन संबोधले जाते. गोळी पाऊच खिशात सहजासहजी बसत असल्याने विक्री करताना रंगेहात पकडणे अवघड होते. अखेर झालाच खुलासा..

नाशिक / मालेगाव : शहरात कुत्ता गोळी विक्री करणारे 40 पेक्षा अधिक विक्रेते आहेत. येथील विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी स्थानिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कुत्ता गोळी विक्रीला चाप लागला पाहिजे. गोळी विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाल्यास युवा पिढी व्यसनापासून व शहर गुन्हेगारीपासून वाचेल. कुत्ता गोळीला सांकेतिक भाषेत बटन संबोधले जाते. गोळी पाऊच खिशात सहजासहजी बसत असल्याने विक्री करताना रंगेहात पकडणे अवघड होते. अखेर झालाच खुलासा...

त्या गोळ्यांचं गुजरात कनेक्शन

शहरातील कुत्ता गोळी विक्री प्रकरणातही गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात विशेष पोलिस पथकाने अटक केलेल्या वसीम शेख याची कसुन चौकशी केल्यानंतर सुरत येथून या गोळ्या व नशेची औषधे शहरात विक्रीसाठी आणण्यात येत होती. आझादनगर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत औषध विक्रेता मेहुलकुमार ठक्कर (रा. सुरत) याला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर औषधे वाहतूक करणाऱ्या ट्रकमालक आरिफ सैय्यद जावीद (रा. म्हाळदे शिवार) व चालक शेख अफजल जमील (रा. नुरबाग) या तिघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून ट्रक (एमएच 41 जी 7776) जप्त करण्यात आला आहे.

शहरात 40हून अधिक विक्रेते
शहरात कुत्ता गोळी विक्री करणारे 40 पेक्षा अधिक विक्रेते आहेत. येथील विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी स्थानिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कुत्ता गोळी विक्रीला चाप लागला पाहिजे. गोळी विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाल्यास युवा पिढी व्यसनापासून व शहर गुन्हेगारीपासून वाचेल. कुत्ता गोळीला सांकेतिक भाषेत बटन संबोधले जाते. गोळी पाऊच खिशात सहजासहजी बसत असल्याने विक्री करताना रंगेहात पकडणे अवघड होते. त्यातच लहान मुलांचाही गोळ्या पोहोच करण्यासाठी वापर होऊ लागला आहे. पोलिसांना खात्रीलायक टीप मिळाल्यानंतरच कारवाई शक्य होते. शहर व परिसरातील कोणताही औषध विक्रेता यात नाही. यापुर्वी नगर, धुळे येथे कनेक्शन मिळाले होते. पाठोपाठ गुजरात कनेक्शन मिळाले आहे.

हेही वाचा > सावध व्हा...'हा' आजार पडेल महागात...कोरोनाचे व्हाल बळी!

छडा लावण्याचे पाेलिसांना आव्हान 

शहरात कुत्ता गोळी विक्री प्रकरणी अटक केलेल्या वसीम शेखकडून सुमारे सव्वातीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यात कुत्ता गोळीसह, गर्भपाताच्या गोळ्या, कोरेक्स औषधाचे बॉक्स जप्त करण्यात आले होते. शहरात नशेसाठी मोठ्या प्रमाणात अल्प्राझोलम या गोळीचा कुत्ता गोळी म्हणून सर्रास वापर होतो. नशेत संशयित गुन्हेगारी कृत्य करतात. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचे पाेलिसांना आव्हान होते. अपर अधिक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप आव्हाड, पोलिस शिपाई भुषण मोरे, भावसार व सहकाऱ्यांनी कसुन चौकशी केल्यानंतर सुरतचे धागेदोरे उघडकीस आले. या पथकाने मेहुलकुमारला अटक केली. वसीमसह तिघा संशयितांना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सकाळी हसतमुख दिसलेल्या लेकीची दुपारी डेडबॉडीच...आईने फोडला हंबरडा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: racket caught by police in nashik marathi news