esakal | हातातोंडाशी आलेला घास हिरावला! भाताच्या आगारात रोगासह निसर्गाचा प्रकोप; शेतकरी संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

igatpuri12.jpg

तालुक्यात चक्क १६० टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात सुरवातीपासूनच भातपीक पाण्याखाली गेले आहे. त्यातूनही सावरत असताना चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाचा मारा चालू झाल्याने भातपिकाला मोठे नुकसान पोचत आहेत. 

हातातोंडाशी आलेला घास हिरावला! भाताच्या आगारात रोगासह निसर्गाचा प्रकोप; शेतकरी संकटात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (इगतपुरी) तालुक्यात यंदा भात पिकांवर संक्रातच आली आहे. करपा, मावा आदी रोगांनी भाताची शेती वाया गेली, तर निसर्गाचाही प्रकोप वाढला आहे. अतिवृष्टीमुळे भातपीक पाण्यात गेले आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी थेट बांधावर जाऊन भातशेतीची पाहणी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

ऐन काढणीत आलेले भातपीक पाण्यात 

पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर या लोकप्रतिनिधींनी थेट शेतात जाऊन भातपिकांची पाहणी केली. त्यामुळे आता अपेक्षा आहे ती फक्त मदतीची. इगतपुरी तालुक्यात पावसाच्या हंगामाने सुरवातीपासूनच जोर धरला होता. मुसळधारेमुळे भातपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ऐन मोसमात भात सोंगणी होत असताना पावसाने कहर केला आहे. त्यामुळे भातशेती उत्पादनात घट होणार, यात शंका नाही. दोन महिन्यांत तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. २०-२२ वर्षांतील विक्रम मोडीत काढत अतिवृष्टीचा फटका बसला. तालुक्यात चक्क १६० टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात सुरवातीपासूनच भातपीक पाण्याखाली गेले आहे. त्यातूनही सावरत असताना चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाचा मारा चालू झाल्याने भातपिकाला मोठे नुकसान पोचत आहेत. 

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

२९ हजार हेक्टर क्षेत्रावर थैमान 

या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी परतीच्या पावसाने व रोगाने २९ हजार हेक्टर क्षेत्रावर थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले आहे. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने शेतकरी हतबल झाला होता. तीच वेळ आता ओढावत असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यंदा वातावरणाची स्थिती पाहून शेतकऱ्यांनी रब्बी पिके व भाजीपाला पिकांची लागवड केली होती. परंतु मुसळधार पावसाने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ