दुष्काळी तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी...चार महिन्यांचा पाऊस अवघ्या दोनच महिन्यांत!

संतोष विंचू
Wednesday, 5 August 2020

मालेगाव, बागलाण, सिन्नर या तालुक्यांत यंदा दोनच महिन्यांत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला, तर येवला, नांदगाव, देवळा या दुष्काळी तालुक्यांतही शंभरीकडे आकडे चालले असल्याने या जिल्ह्यात चार महिन्यांचा पाऊस दोनच महिन्यांत पडला आहे. 

नाशिक : (येवला) पावसाळ्याचे चार महिने संपूनही जिल्ह्यातील काही तालुक्यांत वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी राखली जात नाही, अशा मालेगाव, बागलाण, सिन्नर या तालुक्यांत यंदा दोनच महिन्यांत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला, तर येवला, नांदगाव, देवळा या दुष्काळी तालुक्यांतही शंभरीकडे आकडे चालले असल्याने या जिल्ह्यात चार महिन्यांचा पाऊस दोनच महिन्यांत पडला आहे. 

सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात

जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर असणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील धरण क्षेत्रात सरासरी २५-३० टक्के पाऊस झाला. जूनचे मासिक सरासरी पर्जन्यमान १७४ मिमी असताना २४६ मिमी (१३६ टक्के) पाऊस पडला, तर जुलैची सरासरी ३३८ मिमी असताना २२८ (६७ टक्के) पाऊस जिल्ह्यात पडला आहे. जुलैतील जिल्ह्याची सरासरी कमी असून, सात तालुक्यांवर कृपादृष्टी केली आहे. जुलैच्या सरासरीच्या तुलनेत मालेगावमध्ये २०२, नांदगावमध्ये २२९, चांदवडमध्ये १४३, बागलाणमध्ये १७७, देवळात १२६, निफाडमध्ये १०४, येवल्यात ११२, तर सिन्नरमध्ये ९६ टक्के पावसाची नोंद झाली. या दोन महिन्यांतील विक्रमी पावसामुळे वार्षिक सरासरीचे आकडेदेखील ओलांडले गेले असून, सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात नोंदला गेला आहे. 

४ ऑगस्टपर्यंत पाऊस (मिमीमध्ये) 

तालुका वार्षिक पर्जन्यमान आतापर्यंत पाऊस वार्षिक टक्केवारी 

नाशिक ६९५ ३५२ ५०.६४ 
इगतपुरी ३०५८ १५७२ ५१.४० 
दिंडोरी ६७९ २३३ ३४.३१ 
पेठ २०४३ ४९१ २४.०३ 
त्रंबकेश्वर २१६६ ४७६ २१.९७ 
मालेगाव ४५७ ५३७ ११७ 
नांदगाव ४९१ ४७२ ९६.१३ 
चांदवड ५२९ ३०७ ५८.०३ 
कळवण ६३९ २९९ ४६.७९ 
बागलाण ४८८ ५५४ ११३.५२ 
सुरगाणा १८९५ ५४१ २८.५४ 
देवळा ४२२ ३६२ ८५.७८ 
निफाड ४६२ २५८ ५५.८४ 
सिन्नर ५२२ ५२४ १००.३८ 
येवला ४५३ ३७७ ८३.२२ 
जिल्हा सरासरी १०७५ ४९० ४९.०३ 

हेहा वाचा > आठवणीतील अयोध्या : जेव्हा शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयू’चा काठ.. नाशिकमधील शिवसैनिकांची कार्यक्रमात छाप

१५-२० दिवसांपासून रोज पडणाऱ्या पावसामुळे कोळम व परिसरात ६० ते ७० टक्के क्षेत्र पाण्याखाली गेले असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत. - गणेश भांडे, कोळम 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in drought taluka exceeded average nashik marathi news