राज ठाकरे यांनाही डोंगऱ्यादेव उत्सवाची भुरळ; आवर्जून जाणून घेतली माहिती

रोशन खैरनार
Friday, 1 January 2021

बागलाण या आदिवासी तालुक्यात शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधवांचे वास्तव्य असून, दरवर्षी मोठ्या उत्साहात ते डोंगऱ्यादेव उत्सव करतात. या उत्सवातील पावरी वाद्याच्या तालावर फेर धरून सादर केल्या जाणाऱ्या आदिवासी नृत्याने भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे.

सटाणा (जि.नाशिक) : आदिवासी परंपरेत महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या डोंगऱ्यादेव उत्सवाची भुरळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही पडली आहे. मनविसेचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे यांनी मुंबई येथे कृष्णकुंज या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेऊन या उत्सवातील तारपा पावरी हे वाद्य भेट दिले. या अनोख्या भेटीमुळे मनसे अध्यक्ष ठाकरे भारावून गेले.

आदिवासी नृत्याने भल्याभल्यांना भुरळ

बागलाण या आदिवासी तालुक्यात शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधवांचे वास्तव्य असून, दरवर्षी मोठ्या उत्साहात ते डोंगऱ्यादेव उत्सव करतात. या उत्सवातील पावरी वाद्याच्या तालावर फेर धरून सादर केल्या जाणाऱ्या आदिवासी नृत्याने भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. कर्णमधूर संगीत आणि लयबद्ध ठेका हे या नृत्याचे वैशिष्ट्य आहे. येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे यांनी ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन बागलाण तालुक्यातील आदिवासी बांधवांचे दैवत असलेल्या डोंगऱ्यादेव उत्सवाचे कंपितवायूस्तंभ प्रकारात मोडणारे पारंपरिक वाद्य तारपा पावरी भेट दिली. त्यांनी आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक उत्सव आणि पावरी वाद्याची माहिती आवर्जून जाणून घेतली.

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ल्याची सामाजिक भावनेतून दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे देखभाल दुरुस्तीचे कार्य आठ ते दहा वर्षांपासून अविरत सुरू आहे. यामुळे या किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाले असून पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर येत असतात. दुर्गवीर प्रतिष्ठाणच्या या कार्याविषयीसुद्धा राज ठाकरे यांनी माहिती घेऊन कामाचे कौतुक केले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, पप्पू पगार, विजय सोनवणे, राकेश देवरे, कौस्तुभ सोनवणे, विकी सोनवणे, कुणाल जाधव, दीपक सोनवणे, प्रथमेश पाठक, कृष्णा दंडगव्हाळ आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray is also fascinated by the Dongaryadev festival nashik marathi news