६५ वर्षांची परंपरा खंडित! कोरोनामुळे गांधीनगर येथील रामलीला रद्द; भाविकांसाठी ऑनलाइन आरती

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Sunday, 11 October 2020

दसऱ्याला गांधीनगर येथील रामलीला मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होतो. चाळीस हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमाला हजेरी लावतात. नाशिकच्या या ऐतिहासिक परंपरेचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लेखी पत्राद्वारे केले आहे.

नाशिक : (नाशिक रोड) कोरोनाच्या सावटामुळे नाशिकचा सांस्कृतिक महोत्सव असणाऱ्या गांधीनगर येथील रामलीला होणार नसल्याची माहिती रामलीला समितीने दिली आहे. ६५ वर्षांत प्रथमच ही परंपरा खंडित होणार आहे. भाविकांना ऑनलाइन आरती उपलब्ध करून देण्याचा विचार रामलीला समिती करीत असल्याचे समितीचे समन्वयक कपिलदेव शर्मा यांनी सांगितले. 

भाविकांसाठी ऑनलइन आरती 

उत्तर भारतीय बांधवांनी सुरू केलेला गांधीनगर येथील रामलीला महोत्सवात अनेक नामवंत कलाकारांनी आजपर्यंत अभिनयाद्वारे सेवा दिलेली आहे. या रामलीलेत १५७ कलाकार दर वर्षी विनामोबदला विनामानधन काम करतात. नवरात्रात दुसऱ्या दिवसापासून या उत्सवाला हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गर्दी करीत असतात. दसऱ्याला गांधीनगर येथील रामलीला मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होतो. चाळीस हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमाला हजेरी लावतात. नाशिकच्या या ऐतिहासिक परंपरेचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लेखी पत्राद्वारे केले आहे. गांधीनगर प्रेस प्रशासनाने या उत्सवाला परवानगी नाकारली आहे. कोरोनाचे सावट लवकर मिटविण्यासाठी या वर्षी आम्ही देवाला प्रार्थना करणार आहोत, असे कलाकारांनी सांगितले. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

यंदा ६५ व्या वर्षांत रामलीला पदार्पण करीत असून, कोरोनामुळे उत्सव रद्द करीत आहोत. अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित पडल्याचे दुःख होत आहे. रावण दहनाचा कार्यक्रमही रद्द करीत आहोत. - कपिलदेव शर्मा, अध्यक्ष, रामलीला समिती  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramlila at Gandhinagar canceled due to corona nashik marathi news