सायंकाळची वेळ..अल्पवयीन तरुणीला फैजलने रस्त्यात एकटे गाठले..अन् मग..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

पीडित साडेसतरा वर्षीय तरुणीने बदनामीच्या भीतीपोटी ही घटना कोणालाही सांगितली नाही. पीडितेने रविवारी आईला ही घटना सांगितली. आईने धीर दिल्यानंतर तरुणीने पवारवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

नाशिक / मालेगाव : साडेसतरा वर्षीय तरुणीने बदनामीच्या भीतीपोटी ही घटना कोणालाही सांगितली नाही. पीडितेने रविवारी आईला ही घटना सांगितली. आईने धीर दिल्यानंतर तरुणीने पवारवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

अल्पवयीन तरुणीला रस्त्यात एकटे गाठले

नजमाबाद भागातील मोहंमदिया हॉल येथे अल्पवयीन तरुणीस एकटे गाठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व चापटीने मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. 21 जूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित साडेसतरा वर्षीय तरुणीने बदनामीच्या भीतीपोटी ही घटना कोणालाही सांगितली नाही. पीडितेने रविवारी (ता. 28) आईला ही घटना सांगितली. आईने धीर दिल्यानंतर तरुणीने पवारवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर पवारवाडी पोलिसांनी संशयित फैजल ऊर्फ सलमान मोहंमद हाशीम (वय 26, रा. महेवीनगर) याला अटक केली. सलमान टेबल जोडणीचे काम करतो. पवारवाडी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्कार, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

विवाहितेचा विनयभंग 
मालेगावच्या कलेक्‍टर पट्टा भागातील नवनाथनगरमधील विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधून तिचा विनयभंग करणाऱ्या गणेश साबळे (रा. नवनाथनगर) याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचा पती गणेशला जाब विचारण्यास गेला असता, त्यालाही संशयिताने शिवीगाळ करून दमबाजी केली. रविवारी हा प्रकार घडला. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape case on a minor girl in Malegaon nashik marathi news