"तुच माझी जीवनसाथी" विश्वास देऊन तरुणीवर वारंवार अत्याचार अन् गर्भपातही...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

संशयित नाईक व पीडिता यांची 2011 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित, गेल्या दहा वर्षात महामार्गावरील हॉटेल कुणाल, त्र्यंबकरोडवरील आनंद रिसोर्ट तसेच पंचवटीतील एका हॉटेलमध्ये वेळोवेळी घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर..

नाशिक : संशयित नाईक व पीडिता यांची 2011 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित, गेल्या दहा वर्षात महामार्गावरील हॉटेल कुणाल, त्र्यंबकरोडवरील आनंद रिसोर्ट तसेच पंचवटीतील एका हॉटेलमध्ये वेळोवेळी घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर..

असा केला विश्वासघात..

पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नाईक व पीडिता यांची 2011 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित, गेल्या दहा वर्षात महामार्गावरील हॉटेल कुणाल, त्र्यंबकरोडवरील आनंद रिसोर्ट तसेच पंचवटीतील एका हॉटेलमध्ये वेळोवेळी घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. यात पीडिता गर्भवती राहिली असता संशयिताने ठार मारण्याची धमकी देत पीडितेला सप्तशृंगी हॉस्पिटलमध्ये बळजबरीने नेले आणि गर्भपात केला. त्यानंतर पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने नकार दिला. त्यामुळे पीडितेने थेट अंबड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संजय बेडवाल करीत आहेत. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार

सिडकोतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, यादरम्यान गर्भपातही करण्यात आला. तर, संशयिताने लग्नास नकार दिल्यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेतली. संतोष ईश्वरलाल नाईक (रा. जोशीवाडा, हिरावाडी) असे संशयिताचे नाव आहे.

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape by showing the lure of marriage nashik marathi news