नाशिकमध्ये आढळला अतिदुर्मिळ 'अल्बिनो' साप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

परिसरात अत्यंत  दु्र्मिळ 'अल्बिनो तस्कर' जातीचा साप आढळला आहे. पांढरी त्वचा आणि गुलाबी डोळे असलेला हा अडीच फुट लांबीचा साप त्याच्या रंगासाठी प्रसिध्द आहे.

नाशिक रोड :  परिसरात अत्यंत  दु्र्मिळ 'अल्बिनो तस्कर' जातीचा साप आढळला आहे. पांढरी त्वचा आणि गुलाबी डोळे असलेला हा अडीच फुट लांबीचा साप त्याच्या रंगासाठी प्रसिध्द आहे. या बिनविषारी सापाची वेगवेगळ्या कारणांसाठी तस्करी केली जाते, त्यामुळे या सापाची अतिदुर्मिळ अशी नोंंद करण्यात आली आहे. 

लाखो रुपायात होते विक्री

नाशिक रोड परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ त्वचेत रंग्रद्रव्याचा अभाव असलेला पांढरा सर्प दिसल्याची माहिती सर्पमित्र विराज पाठक यांना मिळाली. घटनास्थळी गेल्यावर तो पांढरी त्वचा, लाल व गुलाबी डोळे असलेला अडीच फुटांचा 'अल्बिनो' प्रकारातील बिनविषारी तस्कर असल्याचे कळले.  यासंदर्भात नाशिक पश्चिम वन विभागाला माहिती दिल्यावर वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव यांनी हा साप ताब्यात घेतला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिदुर्मिळ साप आढळल्याची नोंद करून त्याला रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडले. या सापाची अतिदुर्मिळ म्हणून नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

म्हणून हा सापाचा रंग पांढरा

सापांच्या शरीरातील मेलॅनिनचे प्रमाण कमी झाल्याने सापाच्या त्वचेचा रंग हळूहळू फिकट होत जातो. अल्बिनीझम ही आनुवंशिक घटना आहे, जन्म होण्याच्या वेळी सापाच्या अंड्याना मिळणारी ऊब तसेच वातावरणातील बदलांमुळे अंड्यातील सापामध्ये रंगद्रव्यांचा अभाव होतो. त्यामुळे सापाची त्वचा पांढरी होते जाते. अल्बिनो साप त्याच्या वेगळ्या रंगामुळे त्याते आकर्षण वाढते. स्वतःच्या बचावासाठी हे आक्रमकपणे चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा स्वभाव थोडासा चिडचिडा असतो तर शत्रूच्या तावडीत सापडल्यावर हे सर्प मेल्याचे सोंगही करतात असे सर्पमित्राने सांगीतले. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rare albino taskar snake found in nashik marathi news