esakal | नामपूरला कांद्याला विक्रमी भाव! शेतीमालाच्या लिलावानंतर शेतकऱ्यांची देयके अदा
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 3.jpg

सोमवारी सकाळी दहाला लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. मोसम खोऱ्यात यंदा कांद्याची विक्रमी लागवड असली तरी शेतकऱ्यांकडील साठविलेला कांदा संपुष्टात आल्याने येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याची दैनंदिन आवक टिकून आहे. यंदा रोगट हवामान, विक्रमी पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला ४० ते ५० टक्के कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

नामपूरला कांद्याला विक्रमी भाव! शेतीमालाच्या लिलावानंतर शेतकऱ्यांची देयके अदा

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नाशिक / नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुमारे ८३० वाहनांतून सुमारे १२ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. कांद्याला चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल असा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय भामरे, उपसभापती चारुशिला बोरसे यांनी दिली. 

संजय भामरे : तीन हजार ८०० रुपये सरासरी भाव 
सोमवारी सकाळी दहाला लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. मोसम खोऱ्यात यंदा कांद्याची विक्रमी लागवड असली तरी शेतकऱ्यांकडील साठविलेला कांदा संपुष्टात आल्याने येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याची दैनंदिन आवक टिकून आहे. यंदा रोगट हवामान, विक्रमी पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला ४० ते ५० टक्के कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

शेतीमालाच्या लिलावानंतर रोखीने शेतकऱ्यांची देयके अदा

सरासरी भाव तीन हजार ८५० रुपये, तर कमीत कमी एक हजार रुपये दर होता. करंजाड उपबाजार आवारात १६६ वाहनांमधून सुमारे तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. चार हजार ५१० रुपये सर्वोच्च, तर तीन हजार ९०० रुपये सरासरी भाव होता. शेतमालाच्या आवकेमुळे बाजार समितीचे आवार फुलून गेले होते. कांदा मार्केटमुळे नामपूर-ताहराबाद रस्त्यालगत वाहतूक वाढली होती. शेतीमालाच्या लिलावानंतर रोखीने शेतकऱ्यांची देयके अदा करण्यात आली. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

आगामी काळात कांद्याचे दर टिकून राहतील.
देशात कांद्याचे दर वाढले आहेत आणि देशांतर्गत बाजारात कांद्याची कमतरता आहे. कोरोनाच्या संकटात काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारतात १९.८ कोटी डॉलर कांद्याची निर्यात झाली. कांद्याची सर्वाधिक निर्यात भारतातून बांगलादेश, मलेशिया, यूएई आणि श्रीलंका येथे होते. देशात कांद्याची मागणी वाढली आहे. आगामी काळात कांद्याचे दर टिकून राहतील. - शरद देवरे, कांदा व्यापारी, नामपूर