नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के; मृत्यूदर २.०५ टक्के

recovery rate of corona patients in nashik division is 82 percent nashik marathi news
recovery rate of corona patients in nashik division is 82 percent nashik marathi news

नाशिक रोड : नाशिक विभागात आजअखेर (ता. २१) १ लाख ६१ हजार ५१८ रुग्णांपैकी १ लाख ३२ हजार २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यःस्थितीत २६ हजार १७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत विभागात ३ हजार ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात जरी रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.७४ टक्के असून मृत्यूदर २.०५ टक्के इतका आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली. 

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ६४ हजार २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५३ हजार २०१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९ हजार ६२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत ४३ हजार ८९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२ हजार ९४१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९ हजार ८५१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत १ हजार १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ६१० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० हजार २२२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार ०४१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आजपर्यंत ३४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३७ हजार १२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२ हजार २०० रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४ हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आजपर्यंत ५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ८८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार ४६३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार ३१५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आजपर्यंत १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यानुसार रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 

नाशिक : ८३. १२ टक्के 
जळगाव : ७५.०३% 
धुळे : ८८.०४ % 
नंदुरबार : ७०.८७ % 
नगर : ८६.७४ % 
 

संपादन - रोहित कणसे

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com