शेतकऱ्यांसाठी 'ते' ठरतायत खरे सिंघम..! शेतकऱ्यांना मिळवून दिले ५८ लाख; ६ व्यापाऱ्यांना अटक 

pratap dighavkar farmer.jpg
pratap dighavkar farmer.jpg

वडनेरभैरव (जि.नाशिक) : शेतकऱ्यांचा वाली म्हणून 'त्यांची' ओळख निर्माण होत असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ते खऱ्या अर्थाने सिंघम ठरत आहेत. नाशिक जिल्ह्यात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नेमणूक झाल्यापासून एकामागून एक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे त्यांच्या कष्टाचे तसेच व्यापाऱ्यांनी डुबलेले शेतमालाचे पैसे मिळू लागले आहे. 

प्रत्येकी ३ लाखांची रिकव्हरी

चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे २३ शेतकऱ्यांचे तब्बल ५८ लाख ६९ हजार ४३० रुपये परत मिळाले आहे. तसेच पैसे परत देण्यास नकार देणाऱ्या ६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ३ लाखांची रिकव्हरी करण्यात आली असून ६ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.

दिघावकर ठरतायत खरे सिंघम

प्रतापराव दिघावकर यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यापासून शेकडो शेतकऱ्यांचे फसवणूक झालेले पैसे मिळाले आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे परिपत्रक काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.

व्यापाऱ्यांनी मागितला वेळ

मनमाड पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात ३३ शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे. वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलून व्यापाऱ्याकडून या शेतकऱ्यांचे सुमारे ५८ लाख ६९ हजार ४३० रुपये शेतकऱ्यांना परत करण्यात आले असून ज्या व्यापाऱ्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला. अशा व्यापाऱ्यांवर एकूण बारा गुन्हे दाखल करून त्यातील सहा व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांकडून तीन लाख रुपये असे ५८ लाख ६९ हजार ४३० रुपये शेतकऱ्यांना परत करण्यात आले आहे. यातील काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे.

शेतकरी वर्गात समाधान

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व लहरी निसर्ग यामुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिसांनी दिलेला मदतीचा हात यामुळे तो सुखावला आहे नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पैसे व्यापारी येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्यासाठी चालू केलेल्या प्रयत्नांचे जिल्हाभरात कौतुक होत असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे अशी मोहीम राज्यभर पोलिसांनी सुरू करावी अशी मागणी देखील पुढे येत आहे.


साहेबांच्या मोहिमेमुळे आम्हा अधिकाऱ्यांना सुद्धा काम करण्यासाठी नवीन चेतना मिळत आहे, शेतकऱ्यांनी आपला मेहनतीने पिकवलेला शेतमाल व्यापाऱ्यांना देतांना त्यांच्याकडून चेक किंवा ॲडव्हान्स स्वरूपात पावत्या घ्याव्यात,जेणे करून न्यायालयीन कामकाजात आरोपीला शिक्षा होण्यास व पैसे परत मिळण्यास मदत होईल तसेच व्यापाऱ्यांची संपूर्ण माहिती व विश्वासहर्ता तपासून माल द्यावा.- गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव पोलीस ठाणे


द्राक्ष बागांचे व्यवहार शेतकरी व व्यापारी यांच्या विश्वासावर होत असतात, शेतकऱ्यांचा बांधावर व्यवहार होत असतात लॉक डाऊन च्या आधी आम्ही व्यापाऱ्याला द्राक्ष माल दिला होता, पैसे मिळत नसल्याने आम्ही पोलिसांची संपर्क साधल्यानंतर व्यापारी व आमच्यात संवाद साधून आमचे पैसे मला दिघावकर साहेबांच्या कामगिरीमुळे मिळाले आहे.- अविनाश खिराडकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी वडनेर भैरव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com