लाल कांद्याची लाली वाढली! मुंगसे बाजारात मिळाला तब्बल ११ हजारांचा भाव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

बंडूकाका बच्छाव म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करावी. कांदा निर्यातबंदी उठवावी. दरम्यान, केंद्र शासनाच्या कांदा साठवणुकी संदर्भातील निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार (ता. २६)पासून लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. 

नाशिक : (मालेगाव) येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर दसऱ्याच्या मुहूर्तावर रविवारी (ता. २५) पावसाळी लाल कांदा विक्रीचा प्रारंभ बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव यांच्या हस्ते झाला. वसंत हिरे यांच्या कांद्याला ११ हजार ११ रुपये भाव मिळाला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

व्यापारी सुरेश झाल्टे यांनी कांदा खरेदी केला. केंद्रावर अडीचशे वाहनांतून सात हजार क्विंटल कांद्याची आवक होती. भाव कमीत कमी एक हजार, तर जास्तीत जास्त ११ हजार ११ रुपये होता. सरासरी बाजारभाव पाच हजार ५०० रुपये होता. लाल कांदा विक्री प्रारंभ कार्यक्रमाला समितीचे उपसभापती सुनील देवरे, व्यापारी रामराव सूर्यवंशी, निंबा सागर, पंकज शेवाळे, राहुल सूर्यवंशी, समितीचे सचिव अशोक देसले आदींसह शेतकरी उपस्थित होते. बंडूकाका बच्छाव म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करावी. कांदा निर्यातबंदी उठवावी. दरम्यान, केंद्र शासनाच्या कांदा साठवणुकी संदर्भातील निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार (ता. २६)पासून लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. 

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red onion fetched Rs 11 thousand in mungase market nashik marathi news