लाल कांदा भावात वाढ; ग्रामपंचायत निवडणुकींच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे विक्रीवर लक्ष  

महेंद्र महाजन
Tuesday, 19 January 2021

कांद्याच्या निर्यातीला सुरवात होऊन दीड महिन्यांचा कालावधी वाढला असला, तरीही पाक आणि चीनच्या कांद्याच्या भावातील तफावतीमुळे अरब राष्ट्र आणि दुबईमधून भारतीय कांद्याला फारशी मागणी राहिलेली नाही.

नाशिक : मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बाजारपेठांमधून लिलाव बंद राहिल्यानंतर सोमवारी (ता. १८) आठवड्याच्या पहिल्या दिवशीच्या लिलावात नवीन लाल कांद्याच्या भावात सरासरी दोनशे रुपयांनी वाढ झाली. एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी कांद्याच्या विक्रीवर लक्ष केंद्रित केले होते. 

ग्रामपंचायत निवडणुकींच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे विक्रीवर लक्ष 

कांद्याच्या निर्यातीला सुरवात होऊन दीड महिन्यांचा कालावधी वाढला असला, तरीही पाक आणि चीनच्या कांद्याच्या भावातील तफावतीमुळे अरब राष्ट्र आणि दुबईमधून भारतीय कांद्याला फारशी मागणी राहिलेली नाही. त्याचवेळी उत्तर भारतातून मकरसंक्रांतीची मागणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आजच्या बाजारभावाकडे शेतकऱ्यांप्रमाणेच निर्यातदारांच्या नजरा खिळल्या होत्या. आज कळवणमध्ये दोन हजार ६००, सटाण्यात दोन हजार ५७५, देवळ्यात दोन हजार ७२५, तर उमराणेत अडीच हजार रुपये असा क्विंटलला सरासरी भाव मिळाला. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

लाल कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ सोमवार (ता. १८) शनिवार (ता. १६) 
येवला दोन हजार ५५० दोन हजार ३०० 
लासलगाव दोन हजार ६५० दोन हजार ६२० 
चांदवड दोन हजार ५०० दोन हजार ३०० 
मनमाड दोन हजार ३५० दोन हजार ४०० 
पिंपळगाव दोन हजार ६५१ दोन हजार ४११  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: red onion prices rising nashik marathi news