'मिळकत हस्तांतरण मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात करा'; आमदार हिरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

प्रमोद दंडगव्हाळ
Saturday, 5 September 2020

शासनाने सिडको, म्हाडा या गृहनिर्माण संस्था, त्याचप्रमाणे 'एमआयडीसी' सारख्या योजना सुरू केल्या आहेत. परंतु आर्टिकल '२५ अ' प्रमाणे मुद्रांक शुल्क तीन टक्के कपातीच्या सवलतीतून सिडको, म्हाडा व 'एमआयडीसी' च्या मिळकतींना यातून वगळण्यात आले आहे. 

नाशिक : (सिडको)सिडको, म्हाडा व 'एमआयडीसी'च्या मिळकती हस्तांतरणास मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात करण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. 

मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांकडे मागणी 

राज्य शासनाने गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात दस्त नोंदविताना कपात केली. ती कपात तीन टक्क्यांपर्यंत केली असून, याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. परंतु सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सिडको, म्हाडा या गृहनिर्माण संस्था, त्याचप्रमाणे 'एमआयडीसी' सारख्या योजना सुरू केल्या आहेत. परंतु आर्टिकल '२५ अ' प्रमाणे मुद्रांक शुल्क तीन टक्के कपातीच्या सवलतीतून सिडको, म्हाडा व 'एमआयडीसी' च्या मिळकतींना यातून वगळण्यात आले आहे. 

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

सीमा हिरे यांची निवेदनद्वारे आग्रही मागणी

नाशिक पश्चिम मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. सिडको, म्हाडा आणि एमआयडीसी या तिन्ही योजनांचा समावेश आहे. अंबड व सातपूर या दोन औद्योगिक वसाहतींचादेखील समावेश आहे. सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण असून, उद्योजकांबरोबरच नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या मिळकती घेणाऱ्या नागरिकांनादेखील मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत मिळण्यासाठी आमदार सीमा हिरे यांनी निवेदनद्वारे आग्रही मागणी केली आहे.  

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduce income transfer stamp duty by three percent, MLA Hiray's demand to the Chief Minister nashik marathi news