सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवून तत्परता दाखवावी; शेतकरी आर्थिक विवंचनेत

onion agitation.jpg
onion agitation.jpg

लासलगाव (जि.नाशिक) : केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात सोमवारी (ता. ७) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही वेळेसाठी लिलाव बंद करून घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. 

लासलगाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी 
सध्या कांदा निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव घसरले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कांदा निर्यात खुली करावी व कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी जोरदार मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या वेळी केली. कांदा उत्पादक शेतकरी सचिन होळकर यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले, की निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर दिवसागणिक खाली येत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता आगामी काळात कांद्याची आवक वाढल्यास बाजारभाव अजून कमी होण्याची शक्यता आहे.

कांद्याची निर्यातबंदी उठवून तत्परता दाखवावी

सरकारने ज्याप्रमाणे जीएसटी, नोटाबंदीबाबत तातडीने निर्णय घेतले, त्याचप्रमाणे कांद्याची निर्यातबंदी उठवून तत्परता दाखवावी. या हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यातबंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असेही ते म्हणाले. बबन शिंदे, धर्मेश जाधव, ज्ञानेश्‍वर पाटील, संदीप उगले, महेंद्र हांडगे, सुरेश कुमावत, राजेंद्र जाधव, राजेंद्र कराड, राजेंद्र होळकर, प्रमोद पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com