जिल्हा बॅंकेच्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

महेंद्र महाजन
Wednesday, 7 October 2020

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनेला ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे संचालक मंडळाने या योजनेला ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मान्यता दिली होती. या काळात ८८५ सभासदांनी योजनेचा लाभ घेतला.

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनेला ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे संचालक मंडळाने या योजनेला ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मान्यता दिली होती. या काळात ८८५ सभासदांनी योजनेचा लाभ घेतला. 

बँकेच्या थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ 

योजनेत भाग घेणाऱ्या कर्जदाराकडील थकीत कर्जाची थकबाकी झाल्यापासून पुढे होणाऱ्या एकूण व्याज रकमेवर ५० टक्के सवलत (योजनेच्या मूळ अटीनुसार) अथवा अधिक साडेचार लाखांपर्यंत थकबाकीदार सभासदांना देण्यात येत आहे. थकबाकीदार यांच्यावर कलम १०१ व १०१ (२) १०७ अन्वये चालू असलेली जप्ती, ‘अपसेट प्राइस’ व लिलाव कारवाई आहे. त्यास्तरावर योजनेतील अटीनुसार कर्जाची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत स्थगित ठेवली जाईल. बँकेला व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली होती. त्याप्रमाणे विविध कार्यकारी संस्थांच्या मोठे थकबाकीदार, प्रभावशाली थकबाकीदारांच्या मालमत्तेवर सहकार संस्था कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून कर्जमाफी योजनाच्या अंमलबजावणीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे बँकेच्या थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 

हेही वाचा > भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

नवीन सुधारित सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० राबवणार

अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी प्राथमिक शेती संस्थास्तरावरील व थेट कर्जाच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसूल होणे आवश्यक असल्याने, तसेच प्राथमिक शेती संस्था व थकबाकीदार सभासदाकडून जुन्या सामोपचार योजनेऐवजी नवीन आकर्षक योजना राबविणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यासाठी बँकेची सध्याची नवीन सुधारित सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० राबवण्याचा निर्णय मेमध्ये संचालक मंडळाने घेतला होता. जिल्ह्यातील योजनेस पात्र थकबाकीदार सभासदांनी भाग घेऊन कर्ज परतफेड करताना भरघोस सवलतीचा लाभ घेऊन पुनश्च कर्ज मिळवणीसाठी पात्र व्हावे व बँकेस सहकार्य करावे, असे बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repayment of Compensation Loan scheme has been extended nashik marathi news