कांदा निर्यातबंदी रद्द करा अन्यथा जिल्हाभरात चक्का जाम; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

केंद्र शासनाने कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळत असतानाच निर्यातबंदी केली देशाचा जीडीपी उणे २४ वर गेला असताना शेती उद्योगामुळे जीडीपीला उभारी मिळणार होती ती देखील या कांद्याच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे मिळणार नाही.

नाशिक : केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थीतीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली शिंदे पळसे टोल नाक्यावरती आंदोलन करण्यात आले.

केंद्र शासनाने कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळत असतानाच निर्यातबंदी केली देशाचा जीडीपी उणे २४ वर गेला असताना शेती उद्योगामुळे जीडीपीला उभारी मिळणार होती ती देखील या कांद्याच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे मिळणार नाही. सर्वसामान्य शेतकरी आधीच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देशोधडीला लागलेला असताना कांद्याच्या माध्यमातून त्यांना  थोडेफार उत्पन्न मिळणार होते परंतु केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे असे कडलक यांनी यावेळी सांगीतले.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

कांदा निर्यातबंदी उठवावी अन्यथा

नाशिक जिल्हा हा देशात एक नंबर कांदा उत्पादक असून नाशिक जिल्ह्यातील खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनामध्ये कांदा निर्यातबंदी उठवावी याची आक्रमक भूमिका मांडली पाहिजे आणि तातडीने याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला पाहिजे. केंद्र शासनाने हा निर्णय शेतकऱ्यांवरील द्वेषभावनेतून घेतला असून केंद्र शासनाने ताबडतोब हा निर्णय रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करेल. तसेच कायदा-सुव्यवस्थेची परिस्थितीला निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी केंद्रशासन जबाबदार असेल असे मत पुरुषोत्तम कडलग यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी  किरण भुसारे, गणेश गायधनी, स्वप्नील चुंबळे, संदीप भेरे, विजू गांगुर्डे, शांताराम झोरे, सौरभ आहिरे, माणिकराव कडलग, प्रफुल्ल पवार, महेश शेळके,निखिल भागवत, मनोज गायधनी, श्रीकांत टावरे, वैभव झाडे, तुषार शिंदे, महेश रोकडे, सोनू ठोंबरे, सागर थेटे, आकाश भागवत, रमेश औटे,मधुकर सातपुते, बाळासाहेब तुंगार, गणपत गायधनी, रामकृष्ण गायखे, संजय धात्रकयांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repeal onion export ban nashik marathi news