शेतकरी केंद्रिभूत मानून संशोधन करावे - कृषिमंत्री दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

यातील १८३ शिफारशी मान्य झाल्या असून, त्यांची अंमलबजावणी राज्यभर होणार आहे. यात नऊ सुधारित शेती पिकांचे वाण, दोन फळपिकांचे (द्राक्ष, भाजीपाला) पिकाचे वाण प्रसारित करून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, असे सांगितले.

मालेगाव (नाशिक) : संशोधनासाठी शेतकरी हा महत्त्वाचा केंद्रिभूत घटक मानून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने संशोधन करावे. कृषी उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देणे, शेतमाल मूल्यवर्धन व मार्केटिंग या क्षेत्रात संशोधनासाठी प्रयत्न करावेत. कृषी विद्यापीठांचे संशोधन पेटंट नोंदणी करून त्याद्वारे विद्यापीठे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करावीत. प्रगतिशिल शेतकऱ्यांचे अनुभव, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संशोधन निष्कर्षांवर विचार करून त्यावर चारही विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनांनी भर द्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.३१) येथे केले. 

संयुक्त कृषी संशोधन, विकास समितीची बैठक 

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ४८ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते. कृषिमंत्री तथा प्रतिकुलपती श्री. भुसे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत यापूर्वी झालेल्या संशोधन शिफारशींच्या विस्तार कार्याचा आढावा, संशोधित पिकांच्या वाणांचे बीजोत्पादन शेतऱ्यांच्या मागणीनुसार करणे, कृषिमाल विपणन क्षेत्रात संशोधन करणे, संशोधित अवजारांची निर्मीती करणे, धनाचा कालावधी कमी करून दर्जेदार व मोठ्या प्रमाणावर शेतकरी हितार्थ संशोधन करणे याबाबत चर्चा करतानाच आढावा घेण्यात आला. ज्या शिफारशी नाकारल्या, त्यांची पूर्तता करून येत्या कालावधीत त्या विचारात घ्याव्यात, अशी सूचनाही श्री. भुसे यांनी केली. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

त्याची अंमलबजावणी लवकरच 

बैठकीस केंद्रिय दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री संजय धोत्रे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक विश्वजित माने, तसेच चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते. बैठकीत १२ गटांत विभागणी केलेल्या शास्त्रज्ञांनी २०८ शिफारशींवर सखोल चर्चा केली. यातील १८३ शिफारशी मान्य झाल्या असून, त्यांची अंमलबजावणी राज्यभर होणार आहे. यात नऊ सुधारित शेती पिकांचे वाण, दोन फळपिकांचे (द्राक्ष, भाजीपाला) पिकाचे वाण प्रसारित करून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, असे सांगितले.  

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research should be done with a focus on farmers - Dada Bhuse nashik marathi news