नाशिककरांनो, करवाढीविरोधातील याचिकेचा निकाल २७ ऑक्टोबरला

विक्रांत मते
Tuesday, 20 October 2020

वार्षिक भाडेमूल्यात पाच ते सहा पटीपर्यंत वाढ केल्याविरोधात नागरिकांनी आंदोलन उभारले होते.

नाशिक : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१८ मध्ये वार्षिक भाडेमूल्य दरात केलेल्या वाढीविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (ता. २७) निकाल दिला जाईल. न्यायमूर्ती काथावाला व कुलाबावाला यांच्या खंडपीठाकडून मंगळवारी (ता. २०) निकाल घोषित केला जाणार होता; परंतु तारीख पुढे ढकलण्यात आली.

वार्षिक भाडेमूल्यात पाच ते सहा पटीपर्यंत वाढ केल्याविरोधात नागरिकांनी आंदोलन उभारले होते. महासभेत नगरसेवकांनी करवाढ रद्द करण्याचा ठराव केला. परंतु ठराव शासनाकडे विखंडनासाठी न पाठविता महासभेचा निर्णय दफ्तरी दाखल करत करवाढीची अंमलबजावणी सुरू केली होती. याविरोधात नगरसेवक गुरुमित बग्गा, शाहू खैरे, सलीम शेख व गजानन शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असून, अंतिम निकाल दिला जाईल.  

 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Result of the petition against tax increase on 27th October nashik marathi news