दलितांना दिली स्वतःच्या मालकीची दहा एकर जमीन... दातृत्ववादी पोलिस निरीक्षक नक्की आहेत तरी कोण? वाचा सविस्तर

राजेंद्र बच्छाव
Saturday, 1 August 2020

आपली दहा एकर जमीन चार दलितांच्या नावावर करून पोलिस ठाण्याच्या गुन्हे निरीक्षकांनी आदर्श निर्माण केला आहे. या कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.​ पोलिस दलात एक आदर्श निर्माण केला आहे.

नाशिक / इंदिरानगर : पोलिस दलातील निवृत्तीनंतर आपली दहा एकर जमीन चार दलितांच्या नावावर करून पोलिस ठाण्याच्या गुन्हे निरीक्षकांनी आदर्श निर्माण केला आहे. या कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

निवृत्त पोलिस निरीक्षकांकडून आदर्श निर्माण..  सर्वत्र कौतुक
इंदिरानगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक पांडुरंग पाटील शुक्रवारी (ता. ३१) पोलिस दलातील चाळीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. १९८० मध्ये धुळे येथे कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी नोकरीला सुरवात केली. यापूर्वी सटाणा येथे कार्यरत असताना त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण थेट विधिमंडळात गाजले होते. दादासाहेब गायकवाड दलित सबलीकरण योजनेअंतर्गत त्यांनी धुळे जिल्ह्यातील वेल्हाने (देवाचे) येथील स्वतःच्या मालकीची १० एकर जमीन प्रत्येकी अडीच एकर याप्रमाणे चार दलितांच्या नावे करून पोलिस दलात एक आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

पोलिस दलात एक आदर्श निर्माण

पोलिस उपायुक्त विजय खरात आणि सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा आणि त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांची मुले हर्षवर्धन आणि आशुतोष पाटील, इंदिरानगर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या शांतता समितीचे सदस्य, पोलिस मित्र, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी आभार मानले. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From retired police inspectors Ten acres of land nashik marathi news