COVID-19 : कुटुंबियांना भेटण्याची लागलीय ओढ...पण, कोरोनाच्या प्रादुर्भावाने परतीचा प्रवास लांबणीवर..

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

परदेश म्हंटल कि विमान प्रवास आला, परदेशात जाण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचे असते. एकदा तरी आयुष्यात विमानात प्रवास करावा असं स्वप्न पाहत असतो. त्यातल्या त्यात काही काळासाठी परदेशात राहण्याची संधी जर मिळाली तर सोन्याहून ही पिवळं. कंपनीच्या कामानिमित्त नेपाळ येथे गेलेलं तुषार थोरात यांचा परतीचा प्रवास कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडला आहे.

नाशिक : (दहीवड) परदेश म्हंटल कि विमान प्रवास आला, परदेशात जाण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचे असते. एकदा तरी आयुष्यात विमानात प्रवास करावा असं स्वप्न पाहत असतो. त्यातल्या त्यात काही काळासाठी परदेशात राहण्याची संधी जर मिळाली तर सोन्याहून हि पिवळं. कंपनीच्या कामानिमित्त नेपाळ येथे गेलेलं तुषार थोरात यांचा परतीचा प्रवास कोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडला आहे. 

घराची ओढ व कुटुंबीयांना भेटण्याची आस लागून आहे...

गुढीपाडवा हा सण जवळ आला आहे कुटुंबियांसोबतच मराठी नवंवर्षाची सुरवात नेहमी करत असतात म्हणून २२ मार्च विमानाचे आरक्षण केले होते. कोरोनामुळे विमानाच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे आरक्षणही रद्द झाले. मूळचे पिंपळगाव वाखारी (ता. देवळा) येथील तुषार रमेश थोरात. त्यांची नवी मुंबई येथे त्रिमूर्ती पॉवर कंट्रोल नावाने कंपनी आहे. ह्या कंपनीत पॉवर जनरेशन व पॉवर प्लांटचे कामे केली जातात. कंपनीच्या कामासाठी थोरात हे नेपाळ देशात इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट च्या कामासाठी महिन्या भरापासून गेले आहेत. जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. घराची ओढ व कुटुंबीयांना भेटण्याची आस लागून आहे परंतु घराकडे येण्याची इच्छा असतानाही त्यांचा परतीचा प्रवास थांबला आहे. 

तसं मन काय इकडे लागेना...

नेपाळ मधील काम संपले असूनही घरी जाऊन कुटुंबियांना भेटू त्यांच्या बरोबर वेळ घालवू शकत नाही अशी त्यांच्या मनात असलेली अंतरीक ओढ, आणि मनात होत असलेली घालमेल त्यांनी कुटुंबियांशी बोलून दाखवली. ते म्हणतात, इथले काम संपले पण आता सध्या बाहेरच्या देशातून कोरोना विषाणूचा जास्त प्रमाणात प्रसार होऊ नये म्हणून आपल्या देशात येणं तूर्त थांबवले आहे. तसं मन काय इकडे लागेना... सारखा आपलं घर आणि घरातील मंडळी यांची न राहून आठवण येते. घर, गाव, देश, आपला परिसर सोडून पोटापाण्यासाठी आलो असलो तरी मन मात्र घराकडे धावतय...

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

आज जवळपास सर्व जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारत सरकार च्या वतीने नियंत्रण आणण्यासाठी ऊपाय योजना करण्यात येत आल्या. ती खुप अभिमानाची गोष्ट आहे, पण कामानिमित्ताने देशा बाहेर गेलेल्या लोकांना घराकडची खुप ओढ लागली आहे. मी ३ मार्च ला नेपाळला आलो आहे २२ मार्च ला परत येणार होतो, पण सीमा बंद केली आहे. विमान सेवा ही बंद आहे म्हणून, येता येत नाही तरी देखील खचुन न जाता लवकरात लवकर विमानसेवा सुरु होईल अशी आशा आहे.
 - तुषार थोरात

हेही वाचा > #COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The return journey is delayed due to corona outbreak nashik marathi news