प्रामाणिकपणाच! सापडलेले तब्बल एक लाख केले परत; म्हसरुळ परिसरातील घटना

योगेश मोरे
Sunday, 24 January 2021

बॅगेत दोन आधारकार्ड, दोन पॅन कार्ड, बँक पासबुक, चेकबुक, लाईटबील आदी कागदपत्रांसह रोख एक लाख रुपये होती. संबंधित कागदपत्रांवरून म्हसरुळ पोलिसांनी राजाराम खर्डे ( हल्ली मुक्काम आंबे, ता. दिंडोरी) यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विचारणा केली.

म्हसरूळ (नाशिक) : तुम्हाला एक लाख रुपये न कष्ट करता सापडले तर तुम्ही काय कराल? सापडलेले पैसे ठेऊन घेणार की परत करणार? बहुतेक लोक ते ठेऊन घेणार असच म्हणतील. पण सापडलेले पैसे किती आहेत हे न बघता ज्याचे आहे त्याला परत करणे हाच खरा धर्म. तीच खरी माणुसकी. समाजात अजूनही खूप व्यक्ती प्रामाणिकपणा जोपासत असतात. त्याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे रतन खांदवे.  

असा आहे प्रकार

म्हसरुळ परिसरातील रहिवासी रतन खांदवे यांना गजपथ परिसरात कागदपत्रांसह एक लाख रुपये असलेली बॅग सापडली. त्यांनी तत्काळ म्हसरुळ पोलिसात संपर्क साधला आणि माहिती दिली. बॅगेत दोन आधारकार्ड, दोन पॅन कार्ड, बँक पासबुक, चेकबुक, लाईटबील आदी कागदपत्रांसह रोख एक लाख रुपये होती. संबंधित कागदपत्रांवरून म्हसरुळ पोलिसांनी राजाराम खर्डे ( हल्ली मुक्काम आंबे, ता. दिंडोरी) यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विचारणा केली. त्यांनी बॅग हरविली असून, बँकेत रोख रक्कमेसह अन्य कागदपत्रे असल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राजाराम खर्डे यांना पोलिसात ठाण्यात बोलावून खात्री केली. सदरील कागदपत्रे आपलेच असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना खात्री पटल्यानंतरच रोख रक्कम आणि कागदपत्रे संबंधित राजाराम खर्डे यांच्या कडे सहायक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या उपस्थितीत खर्डे यांना सुपूर्द केली. रतन खांदवे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

मेंदूवरील शस्रक्रिया करण्यासाठी सेंट्रल बँकेतून १ लाख रुपये काढले होते. ते घरी घेऊन जात असताना पैशांची बॅग कुठे हरवली, हे आजारपणामुळे बिलकूल आठवतच नव्हते. परंतु, दैवी कृपेमुळे आणि रतन खांदवे यांच्या प्रामाणिकपणामुळेच हरवलेले एक लाख रुपये मिळाले. - राजाराम खर्डे 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Returned one lakh found at Mhasrul nashik marathi news