छोटा ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकचा ऋग्वेद वडगावकर विजेता 

अरुण मलाणी
Thursday, 8 October 2020

खेळाडूंना प्रत्येकी पाच सामने खेळण्याची संधी होती. प्रत्येक खेळाडूला दहा मिनिटे व दहा सेकंदांची इंक्रीमेंट वेळ दिली होती. त्यामुळे खेळाडूंना जास्त वेळ खेळण्याची संधी मिळाली.

नाशिक : मोरफी चेस ॲकॅडमीतर्फे झालेल्या राज्यस्तरीय छोटा ग्रँडमास्टर ऑनलाइन बुद्धिबळ स्‍पर्धेत नाशिकच्‍या ऋग्वेद वडगावकरने विजेतेपद पटकावले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १०, १२ व १५ वर्षांखालील गटांतील पहिल्या तीन खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. 

खेळाडूंना प्रत्येकी पाच सामने खेळण्याची संधी होती. प्रत्येक खेळाडूला दहा मिनिटे व दहा सेकंदांची इंक्रीमेंट वेळ दिली होती. त्यामुळे खेळाडूंना जास्त वेळ खेळण्याची संधी मिळाली. स्पर्धेत नाशिकसह मुंबई, ठाणे येथील खेळाडू सहभागी झाले होते. अनेक रेटेड खेळाडूंचाही त्यात समावेश होता. कॅन्डीडेट मास्टर व जागतिक बुद्धिबळ संघटनेचे मान्यताप्राप्त प्रशिक्षक विनोद भागवत यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम नाशिकमध्ये राबविण्यात आला. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

स्‍पर्धेतील गटनिहाय (प्रथम, द्वितीय, तृतीय) विजेते असे : 

दहा वर्षांखालील : दिव्यंश मारू, शरविन पाटील, गारगी येवलेकर. 
१२ वर्षांखालील : श्रेयस पेखळे, तनिश येवले, शरविल पवार. 
१५ वर्षांखालील : ऋग्वेद वडगावकर, प्रेषित सोनी, प्रणव जोशी.  

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rigveda wadgaonkar of nashik is the winner in the chhota grandmaster chess tournament