मध्यरात्रीचा थरार! दरवाजाची फळी कापली अन् शिरला क्वारंटाईन कुटुंबाच्या घरात..परिसरात दहशतीचे वातावरण

प्रमोद सावंत
Wednesday, 12 August 2020

रात्रीची वेळ.. एका घरात क्वारंटाईन झालेले कुटुंब..आणि त्यात अज्ञाताने घराच्या पाठीमागील दरवाजाची लाकडी फळी कापून आत प्रवेश केला. त्यानंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके काय घडले?

नाशिक / मालेगाव : रात्रीची वेळ.. एका घरात क्वारंटाईन झालेले कुटुंब..आणि त्यात अज्ञाताने घराच्या पाठीमागील दरवाजाची लाकडी फळी कापून आत प्रवेश केला. त्यानंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके काय घडले?

असा घडला प्रकार

कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे संपुर्ण कुटूंब अजमीरसौंदाणे येथील उपचार केंद्रात दाखल असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची फळी कापून घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 5 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी घरफोडीने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घरातील स्टिलच्या डब्यात ठेवलेले 3 लाख 10 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने व 2 लाख 50 हजाराची रोकड असा सुमारे 5 लाख 60 हजार रूपयांचा एैवज घेवून चोरटे फरार झाले.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

दरवाजाची लाकडी फळी कापून आत प्रवेश

याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात संदीप गांगुर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे. गावातील त्यांचे काका रघुनाथ तुळशीराम गांगुर्डे यांच्यासह परिवार अजमीरसौंदाणे येथील कोरोना उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल आहेत. घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने रात्रीतून घराच्या पाठीमागील दरवाजाची लाकडी फळी कापून आत प्रवेश केला.

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

घरफोडीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपअधिक्षक शशिकांत शिंदे, पो.नि. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अधिक तपास सपोनि पाटील हे करीत आहेत.

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery at quarantine family house malegaon nashik marathi news