जिवंतपणीच पसरली निधनाची अफवा...अन् पायाखालची जमीनच सरकली...पण...

सोमनाथ गोविंदा साबळे.jpg
सोमनाथ गोविंदा साबळे.jpg

नाशिक : मी पी. एस. आय. आहे असे सांगितल्यावर तिकडून विचारणा केली जायची तुमच्या ड्युटीचा परिसर कोणता? मी मालेगाव सांगताच ते हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी धजावत नव्हते...माझ्या निधनाची वार्ता पसरवली त्याने अजूनच खचलो परंतु माझ्यातील सज्ञानता जिवंत असल्यामुळे मी त्या कोरोनाच्या आजाराला चितपट केले व त्या अफवांच्या चर्चेवर विजय मिळवला आहे.

ड्युटीचा परिसर मालेगाव सांगताच कोणीही दाखल करेना

मी सोमनाथ गोविंदा साबळे, पोलीस उपनिरीक्षक माझी नेमणूक नाशिक नियंत्रण कक्ष आडगाव पोलीस स्टेशनला होती. नेमणुकीस असताना १२ एप्रिल रोजी मालेगावला बंदोबस्तासाठी पॉझिटिव्ह एरियात ड्युटी लागली. नेहरू नगर, मच्छी मार्केट, आझाद नगर मध्ये सेक्टर नं २ ला चेकिंग अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली होती. नाईट ड्युटीवर असताना कर्मचारी चेक करणे हे काम मी करत होतो. काही दिवसांनी माझ्या समोरून काही लोक मृतदेह घेऊन जात असताना लक्षात आले. एका सहकार्याने मला सांगितलं साहेब हा मृतदेह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आहे. माझं वय ५७ वर्ष असल्यामुळे मला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. या नेमून दिलेल्या ठिकाणी काम करत असताना मला खोकला आणि ताप जाणवू लागला. २० एप्रिलला अप्पर पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या आजाराबद्दल तसेच ताप, खोकला येत असल्याचे सांगितले व मेडिकल रजेवर जाण्याबाबत विचारणा केली. कुटुंबियांनाच्या आग्रहाखातर मी २३ एप्रिल कोरोनाची मालेगावला तपासणी केली. परंतु १ मेपर्यंत माझा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळत नव्हते. मी पी एस आय आहे असे सांगितल्यावर तिकडून विचारणा केली जायची तुमच्या ड्युटीचा परिसर कोणता? मी मालेगाव सांगताच ते हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी धजावत नव्हते. 

कुटुंबिय डांगसौंदणे येथे क्वारंटाईन...

पुन्हा शासकीय रुग्णालयात कुटुंबियासमवेत स्वँब देण्यासाठी गेलो परंतु तिथे स्वँब देण्यासाठी रांगाच रांगा होत्या. माझ्याने उभं राहिलं जात नव्हतं. कुटुंबियांनी तिथल्या डॉक्टरांना माझ्याबद्दल सांगितले तेव्हा मला डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये मला दाखल केले आणि उपचार सुरू केले. तिथे उपचार घेत असताना मालेगाव येथिल अहवालामध्ये माझा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला हे कळताच मी अर्धा संपलो होतो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये हलविण्यात आले. परंतु त्या कक्षात माझ्याकडे वैद्यकीय कुणीही लक्ष देत नव्हते. एस पी मॅडम व आय जी साहेब यांना मी एसएमएस केला की इथे माझी योग्य व्यवस्था नाहीये. त्यांनी मला तिथुन तत्काळ एम व्ही पीच्या रुग्णालयात हलवले. माझा रिपार्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे माझ्या कुटुंबियातील सर्वांना डांगसौंदणे येथे क्वारंटाईन केले होते. 

अऩ् मी कोरोनाला चितपट केले...

कुटुंब संपर्कात आपल्यामुळे त्यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली परंतु त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे मी सुटकेचा निश्वास सोडला. उपचार सुरू असताना डॉक्टर दिवसभरातून तीन वेळा राउंड घ्यायचे. उपचारा दरम्यान सकाळी काढा द्यायचे त्यात आल्याचा रस, वेलदोडा, लवंग, हळद, मीठ टाकून काढा द्यायचे. या उपचाराच्या कालावधीत मी व्यायाम देखील केला. मविप्रच्या रुग्णालयात उपचार घेत असताना गावाकडे माझ्या निधनाची वार्ता पसरवली त्याने अजूनच खचलो परंतु माझ्यातील सज्ञानता जिवंत असल्यामुळे मी त्या आजाराला चितपट केले आणि अफवांवर विजय मिळवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com