साक्री-शिर्डी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! सहा दिवसांतील सलग तिसरी धक्कादायक घटना 

sakri highway 1.jpg
sakri highway 1.jpg

सटाणा (जि.नाशिक) : शहरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच साक्री-शिर्डी महामार्गावर घटना घडली. याच ठिकाणी सहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

सहा दिवसांतील ही तिसरी घटना

शहरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच साक्री-शिर्डी महामार्गावरील शहरालगत असलेल्या मोरेनगर फाट्यानजीक सटाणा-देवळा रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीत शनिवारी (ता. २३) झालेल्या भीषण अपघातात शोएब पप्पू शेख (वय २३) जागीच ठार झाला. याच ठिकाणी सहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याने शहर वळण रस्त्याचे प्रलंबित काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे. 

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात तरुण ठार; सलग तिसरी घटना 
याबाबत माहिती अशी - शहरातील आंबेडकरनगर, पिंपळेश्‍वर रोड परिसरात वास्तव्यास असलेला शोएब पप्पू शेख त्याच्या मित्राला साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मोरेनगर शिवारातील चिनार गेस्ट हाउसजवळ दुचाकी (एमएच ४१ पी ०१७८) वरुन रात्री अकराला सोडण्यासाठी गेला होता. मित्राला सोडून परत येत असताना मोरेनगर फाट्यालगत असलेल्या हॉटेल गोविंदमसमोर भरधाव असलेल्या जॉन डियर कंपनीच्या ट्रॅक्टरने शोएबच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. यानंतर शोएबला सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी जाहीर केले. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील तपास करीत आहे. 

साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरचालक भरधाव वाहन चालवत असतात. त्यातच ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागच्या बाजूने रिफ्लेक्टर लावले जात नसल्याने रात्री वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच ही वाहने मोठ्या आकाराचे साउंडही लावतात. यामुळे अनेकदा अपघात घडतात. यामुळे नियमांची पायमल्ली करून अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. - पंडितराव अहिरे, सामाजिक कार्यकर्ते  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com