माध्यमिक कर्मचाऱ्यांचे वेतन आता थेट वैयक्तिक खात्यावर; वेतन पथकाचा राज्यात पहिलाच प्रयोग

घनश्याम अहिरे 
Thursday, 14 January 2021

शिक जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सराव पाठशाळा, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन आता जिल्हास्तरावरून थेट कर्मचारी यांचे खात्यावर वर्ग होण्याची प्रक्रिया वेतन पथक माध्यमिक कडून आगामी महिन्यापासून राबविण्यात येणार आहे.

दाभाडी (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सराव पाठशाळा, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन आता जिल्हास्तरावरून थेट कर्मचारी यांचे खात्यावर वर्ग होण्याची प्रक्रिया वेतन पथक माध्यमिक कडून आगामी महिन्यापासून राबविण्यात येणार आहे.

पंधरा हजार कर्मचाऱ्यांना लाभ 

राज्यात प्रथमच विना अडथळा वेतन वर्ग करण्याचा प्रयोग नाशिक वेतन पथक (माध्यमिक) राबविला जाणार आहे. यात नाशिक जिल्ह्यात ९३४ खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १५ हजार कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पद्धतीने वेतन वर्ग होणार आहे. 

कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त

विद्यमान कार्यप्रणाली नुसार वेतन पथकाकडून मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त खात्यावर कर्मचाऱ्यांची वेतन रक्कम वर्ग होते. ही रक्कम त्या- त्या शाळांतील मुख्याध्यापक अधिनिस्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतात. नव्या प्रयोगात आता कर्मचाऱ्यांची वेतन रक्कम थेट वैयक्तिक खात्यावर आणि आयकर, सोसायटी कर्ज हप्ता, विमा आदी तत्सम कपातींची रक्कम मुख्याध्यापकांचे संयुक्त खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. वेतन पथक आणि आयडीबीआय बँकेच्या वरिष्ठांनी या प्रक्रियेच्या अंतिम पूर्तता पूर्ण केल्या आहेत. त्रुटी पूर्ततेसाठी जिल्ह्यातील शाळांकडून कर्मचाऱ्यांची बँक खातेनिहाय माहिती मुख्याध्यापकांचे शालार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. ही योजना राबविल्याने कर्ज हप्ते परतफेडीसह विनिमय वेळेत होणार असल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

ट्रेझरी, वेतन पथक, संबंधित बँक,मुख्याध्यापक संयुक्त खाते आणि नंतर कर्मचारी खाते असा कालापव्यय संपून आता वेतनाची रक्कम थेट कर्मचारी यांचे खातेवर वर्ग होण्याची कार्यवाही स्वागतार्ह आहे. वेतन पथकाच्या निर्णयाने कर्मचारी सुखावले आहेत. 
- शशांक मदाने, शिक्षक नेते, नाशिक 

खातेदार कर्मचाऱ्यांना पीएफ स्लिप ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर डी सी पी एस च्या स्लिप्स ही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता वेतन रक्कम थेट कर्मचारी यांचे खातेवर आगामी महिन्यापासून वर्ग करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. आगामी महिन्यात सदर वेतन अनुदान सर्व कर्मचारी यांचे खातीच जमा करण्यात येईल. 
-उदय देवरे, अधीक्षक, वेतन पथक कार्यालय नाशिक 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salaries of employees in private aided schools will be credited to the personal account nashik marathi news